हरियाणा-थलैव्वा सामना बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:01 AM2017-08-17T04:01:59+5:302017-08-17T04:02:01+5:30

तमिळ थलैव्वाने शेवटच्या काही मिनिटात अत्यंत नियोजनबद्ध खेळ करत हरियाणाला २७-२७ असे बरोबरीत रोखले.

The match between Haryana and Thalawwa is tied | हरियाणा-थलैव्वा सामना बरोबरीत

हरियाणा-थलैव्वा सामना बरोबरीत

googlenewsNext

अहमदाबाद : तमिळ थलैव्वाने शेवटच्या काही मिनिटात अत्यंत नियोजनबद्ध खेळ करत हरियाणाला २७-२७ असे बरोबरीत रोखले. येथे सुरु असलेल्या प्रो कबड्डीच्या इंटर झोन प्रकारातील तिसºया सामन्यात पिछाडी भरून काढत थलैव्वाने सामन्यात बरोबरी साधली. शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्कंठा वाढलेल्या या सामन्यात थलैव्वाने बाजी मारली.
अनुभवी वझीरसिंग व सुरेंद्र नाडा या अनुभवी खेळाडंूचा समावेश असणाºया हरियाणा स्टेलर्स या संघाच्या तुलनेत अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणारा तमिळ थलैव्वाच्या संघात नवोदित खेळाडूंचा समावेश होता. पुर्वार्धात दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. हरियाणाचा कर्णधार सुरेंद्र नाडाने संघाची आघाडी कमी होऊ नये याची नेहमीच काळजी घेतली. तमिळ थलैव्वाकडून अजय ठाकूर व प्रपंजन यांनी गुण घेतले. मात्र त्यांना आघाडी घेण्यात अपयश आले. थलैव्वाने मध्यंतरापुर्वी कोरियन खेळाडू डोनजिआॅन ली याला मैदानात उतरवले. मात्र पुर्वार्ध संपला तेंव्हा १३-१० अशी तीन गुणांची हरियाणाकडे आघाडी होती. त्यानंतर मात्र थलैव्वाने आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. प्रपंजन याने सुपर रेड द्वारे दोन गुण वसूल केले. गुणांची आघाडी असतानाही हरयानाच्या खेळाडूंनी लोण ओढवून घेतला. याचबरोबर थलैव्वाने पिछाडी भरुन काढत १४ -१७ अशी तीन गुणांची आघाडी घेतली. मात्र ही हरियाणाच्या खेळाडूंनी हळूहळू ही आघाडी कमी करण्यास प्राारंभ केला. अजय ठाकूर ऐवजी मैदानात उतरलेल्या ली यालाही यश मिळत नव्हते. त्यामुळे चढाईची सर्व जबाबदारी प्रपंजनवर आली.
अमित हुडा व विकास कंडोला यांनी चांगल्या पकडी करत त्याला साथ दिली. मात्र सुरेंद्र नाडाने आपला अनुभव पणास लावत संघाला पुन्हा २२-२२ अशी बरोबरी साधून दिली. थलैव्वाचा स्टार खेळाडू अजय ठाकूर मैदानात नसल्याचा फायदा हरियाणाच्या खेळाडूंनी घेतला. प्रपंजनची पकड करत पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. मात्र नियोजनबद्ध खेळ करत थलैव्वाने हा सामना २५-२५ असा बरोबरीत सोडवत हरियाणाला विजयापासून रोखले. (वृत्तसंस्था)
>गुजरात जायंट्सचा सलग पाचवा विजय
राहुल चौधरी, राकेश कुमार, नीलेश साळुंखे या स्टार खेळाडूंचा समावेश असणाºया तेलगू टायटन्सला आजही लय सापडली नाही. गुजरात फॉर्च्युन जायंट्सने तेलगू टायटन्सवर २९-१९ अशी १० गुणांनी मात करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
पूर्वार्धात नेहमी सावध खेळ करणाºया गुजरातने आज सुरुवातीपासूनच आक्रमक खेळास प्रारंभ केला. रोहित गुलिया व सचिन तवर यांनी तेलगू टायटन्सच्या खेळाडूंची लयच बिघडवून टाकली. सचिनने सुपर रेडद्वारा तीन गुण घेत तेलगूवर पहिला लोण चढवला. या लोणमुळे गुजरातकडे १२-३ अशी नऊ गुणांची आघाडी झाली. या आघाडीमुळे विस्कळीत झालेल्या तेलगूच्या खेळाचा फायदा गुजरातने उठवला. पूर्वार्ध संपला तेव्हा २०-७ अशी १३ गुणांची मोठी आघाडी गुजरातने मिळवली होती.
उत्तरार्धातही तेलगूच्या खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. सचिन तवरच्या चढाईला तेलगूच्या खेळाडूंकडे उत्तर नव्हते. राहुल चौधरी बहुतांश वेळ मैदानाबाहेरच होता. फजल व अबोझर यांनी आपल्या पकडीद्वारे संघाने मिळवलेली आघाडी कमी होऊ दिली नाही. राहुल चौधरीला मैदानाबाहेरच ठेवण्याचे गुजरातचे डावपेच यशस्वी ठरले. गुजरातने आपली आघाडी वाढवतच नेली व सामना २९-१९ असा दहा गुणांनी जिंकला.

Web Title: The match between Haryana and Thalawwa is tied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.