काय सांगता! ३१ लाख रूपयांचे दोन खरबूज, पण इतकी किंमत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:44 PM2019-05-27T13:44:01+5:302019-05-27T13:48:03+5:30

सामान्यपणे १०० रूपये देऊन कलिंगड किंवा खरबूज खरेदी केलं जातं. पण जपानमधून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने खरबूज प्रेमींची झोपच उडवली आहे.

Why someone just bought a pair of melons worth 31 lakh in Japan | काय सांगता! ३१ लाख रूपयांचे दोन खरबूज, पण इतकी किंमत का?

काय सांगता! ३१ लाख रूपयांचे दोन खरबूज, पण इतकी किंमत का?

Next

उन्हाळ्यात खरबूज आणि कलिंगड खाणं अनेकांना पसंत असतं. मग त्यासाठी लोक जास्त पैसेही मोजतात. सामान्यपणे १०० रूपये देऊन कलिंगड किंवा खरबूज खरेदी केलं जातं. पण जपानमधून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने खरबूज प्रेमींची झोपच उडवली आहे. जपानमध्ये खरबूजांची जोडी तब्बल ३१.६ लाख रूपयांना विकली गेली आहे. जपानमध्ये दरवर्षी खरबूजांची बोली लागते, ज्यात लोक मोठमोठी बोली लावतात. गेल्यावर्षी अशीच खरबूजांची जोडी २० लाख रूपयांना विकली गेली होती. 

(Image Credit : The Straits Time)

इतकी बोली का?

जपानच्या युबारीमध्ये खरबूजांवर बोली लावण्यात आला. हे दोन खरबूज एका व्यक्तीने ३१ लाख ६९ हजार ७७० रूपयांना खरेदी केले. केशरी रंगाचं हे खरबूज फार गोड असतं. ही खरबूजाची एक खास प्रजाती असून याला केंटालूप असं नाव आहे. जपानच्या युबारीमधील थोक मार्केटमध्ये अशा १ हजार खरबूजांवर बोली लागली आहे. पण रेकॉर्ड या खरबूजांच्या जोडीने नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, सर्वसामान्य लोकांना हे खरबूज बघता यावेत म्हणून ते प्रदर्शनात ठेवले जातील. जगभरातील ५१ टक्के केंटालूपची निर्यात चीनकडून केली जाते. 

जपानमध्ये दरवर्षी मे महिन्यात वेगवेगळ्या फळांची विक्री होते. यातील काही खास फळं असतात, जे जपानी लोकांना फार आवडतात. ही फळं महागडी विकली जातात. केंटालूप खरबूजही त्यापैकी एक आहे. हे फळ जपानमध्ये हाय क्वालिटी फळ मानलं जातं.

खरबूजाचे फायदे

रिपोर्टनुसार, खरबूजाच्या १०० ग्रॅम भागात ३४ कॅलरी असतात. सोबतच यात व्हिटॅमिन ए, सी आणि बी चं अधिक प्रमाण असतं. तसेच फायबर, पोटॅशिअम, कॉपर आणि ओमेगा-३ सुद्धा भरपूर असतं. याने हार्ट आणि फुप्फुसांच्या आजारांपासून बचाव होतो. 

Web Title: Why someone just bought a pair of melons worth 31 lakh in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.