VIDEO- कॅप्टनकूल धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर बिनधास्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:58 AM2017-11-09T11:58:00+5:302017-11-09T12:09:51+5:30

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे.

VIDEO- MS Dhoni dances on Desi Boyz | VIDEO- कॅप्टनकूल धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर बिनधास्त डान्स

VIDEO- कॅप्टनकूल धोनीचा देसी बॉईजमधील गाण्यावर बिनधास्त डान्स

Next
ठळक मुद्दे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे. धोनीच्या या वेगळ्या हटके बाजूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मुंबई- टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कूल अंदाजामुळे सगळ्यांच्याच आवडीचा आहे. धोनीची वागणूक, त्याचं टॅलेन्ट तसंच ग्राऊंडवरील फॉर्ममुळे तो काही काळातच सगळ्यांच्या पसंतीस उतरला. महेंद्रसिंह धोनीची प्रत्येक गोष्ट त्याचे फॅन्स उचलून धरतात. पण क्रिकेट व्यतिरिक्त धोनीची एक वेगळी ओळखसुद्धा आहे. धोनीला मजा-मस्ती करायला खूप आवडतं. फन लविंग पर्सन अशी त्याची ओळख आहे. धोनीची त्याच्या मुलीबरोबरची मस्ती आणि त्याचे सोशल मीडियावरील व्हिडीओ याबद्दलची माहिती देत असतात. 

धोनीच्या या वेगळ्या हटके बाजूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनी देसी बॉईजमधील एका गाण्यावर धमाल नाचताना दिसतो आहे.देसी बॉईज या सिनेमातील गाण्यावर धोनीचा डान्स बघताना त्याची पत्नी साक्षी त्याला प्रोत्साहीत करताना दिसते आहे. तसंच धोनीचा डान्स पाहून साक्षीला हसू आवरत नाहीये. पण हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, याबद्दलची माहिती मिळाली नाहीये. देसी बॉईज हा सिनेमा 2012मध्ये प्रदर्शित झाला होता. 

सिनेमातील गाण्याच्या काही डान्स स्टेप करताना धोनी स्वतःसुद्धा ते तितकंच एन्जॉय करतो आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने  वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. धोनी कॅप्टन असताना टीम इंडियाने 2011मध्ये वर्ल्डकप जिंकलं.  2007 मध्ये पहिल्यांदा धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड टी-20 वर नाव कोरलं. 2013 मध्ये धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली. 

Web Title: VIDEO- MS Dhoni dances on Desi Boyz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.