गाडीवर प्रेम, ड्रायव्हरचे गिअर बदलणे आवडले; करोडपती मुलीने लग्नच उरकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:42 PM2022-11-01T12:42:57+5:302022-11-01T12:44:19+5:30

पतीसाठी तिने बॉलीवुडचे सुपरहिट गाणे 'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी गुम जाए' हे डेडिकेट केले. यावर मुलाखत घेणाऱ्याने चाबी गुम असे विचारले तर पतीने गंमतीने आता तर कारभी गुम असे उत्तर दिले.

Trending Love Story: Loved the car, liked changing the driver's gear; The millionaire girl got married with him from Pakistan | गाडीवर प्रेम, ड्रायव्हरचे गिअर बदलणे आवडले; करोडपती मुलीने लग्नच उरकले

गाडीवर प्रेम, ड्रायव्हरचे गिअर बदलणे आवडले; करोडपती मुलीने लग्नच उरकले

googlenewsNext

जेव्हा प्रेम होते, ते काही जात पात, गरीब- श्रीमंती पाहून होत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही या प्रेमवीरांची असते. अशीच एक लव्हस्टोरीची चर्चा पाकिस्तानात रंगली आहे. एका श्रीमंत घरच्या मुलीने तिच्या ड्रायव्हरशीच लग्न केले आहे. या तरुणीला ड्रायव्हरचा गिअर टाकण्याचा अंदाज आवडला आणि ती त्याच्यावर फिदा झाली. यानंतर तिने त्याच्यासोबतच आयुष्य घालवण्याचे ठरविले. 

डेली पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत या तरुणीने सांगितले की, तिचा पती आधी ड्रायव्हर होता. तिला तो कार शिकवायचा. गाडी शिकत असताना तिला त्याचा गिअर टाकण्याचा अंदाज आवडला. तिला ती गाडी खूप आवडायची. तो ज्या पद्धतीने गिअर टाकायचा ते पाहून मालकीनीला चांगले वाटायचे. याच गोष्टीवर ती फिदा झाली आणि हृदय देऊन बसली. 

पतीसाठी तिने बॉलीवुडचे सुपरहिट गाणे 'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी गुम जाए' हे डेडिकेट केले. यावर मुलाखत घेणाऱ्याने चाबी गुम असे विचारले तर पतीने गंमतीने आता तर कारभी गुम असे उत्तर दिले. या दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. आता तो तिच्या घरी ड्रायव्हर म्हणून नाही तर जावई म्हणून एन्ट्री करतो, असे त्याने सांगितले. 
तो जेव्हा गाडी शिकवताना गिअर बदलायचा तेव्हा तिला त्याचा हात पकडण्याचा मोह व्हायचा. इथेच ती त्याच्या प्रेमात पडली. 

Web Title: Trending Love Story: Loved the car, liked changing the driver's gear; The millionaire girl got married with him from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.