कुठे जीन्सवर तर कुठे जॉगिंगवर बंदी, या आहेत जगभरातील विचित्र १० बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 03:31 PM2018-07-18T15:31:23+5:302018-07-18T15:31:44+5:30

जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या गोष्टींवर बंदी आहे. यातील काही बंदी तर इतक्या विचित्र आहेत की, तुम्हीही चक्रावून जाल. 

top 10 weird bans by governments around the world | कुठे जीन्सवर तर कुठे जॉगिंगवर बंदी, या आहेत जगभरातील विचित्र १० बंदी

कुठे जीन्सवर तर कुठे जॉगिंगवर बंदी, या आहेत जगभरातील विचित्र १० बंदी

googlenewsNext

सध्या भारतात वेगवेगळ्या गोष्टींवरील बंदीमुळे चांगलाच गदारोळ बघायला मिळतो. पण केवळ भारतातच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या गोष्टींवर बंदी आहे. यातील काही बंदी तर इतक्या विचित्र आहेत की, तुम्हीही चक्रावून जाल. 

अर्ध्या रात्री क्लबमध्ये डान्सवर बंदी

व्दितीय महायुद्धानंतर जपानमध्ये देहविक्रीवर आळा घालण्यासाठी एका कायदा तयार केला होता. त्या काळात क्लबची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ होती. आणि रात्री उशिरा डान्स करण्यासाठी त्यांना एका लायसन्सची गरज पडत होती. नंतर या कायद्या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर हा कायदा मागे घेण्यात आला होता. 

इमो ड्रेसिंगवर बंदी

रशियामध्ये असं आढळलं होतं की, एका खासप्रकारची फॅशन म्हणजेच इमो फॅशनचे शौकीन लोक मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यानंतर इमो फॅशन आणि त्या ड्रेस सेंसवर बंदी घालण्यात आली. 

डेनमार्कमध्ये मुलांची नावं

डेनमार्कमध्ये लोक आपल्या मुलांची नावं स्वत:च्या मर्जीने ठेवू शकत नाहीत. सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या ७ हजार नावांपैकीच एखादं नाव त्यांना आपल्या मुलांसाठी निवडावं लागतं. पहिलं नाव असं ठेवावं लागतं ज्यावरून बाळाचा लिंग कळेल. वेगळं नाव ठेवण्यासाठी येथील लोकांना चर्च आणि सरकारची मंजूरी घ्यावी लागते. 

जॉगिंगवर बंदी

भलेही तुम्ही जॉगिंगचे शौकीन असाल पण बुरूंडी येथे तुम्ही जॉगिंग करू शकत नाही. मार्च २०१४ मध्ये पूर्व आफ्रिकेच्या या देशात तेथील राष्ट्रपतींनी बंदी घातली. यासाठी कारण देण्यात आलं होतं की, लोक असामाजिक कामांसाठी जॉगिंगची मदत घेतात. 

क्लेर डेंसवर मनीलामध्ये बंदी

१९९८ मध्ये अमेरिकन अभिनेत्री क्लेर डेंसने मनीलाबाबत काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती की, इथे झुरळांसारखा वास येतो. त्यासोबतच आणखीही काही वादग्रस्त विधानं तिने केली होती. त्यानंतर सिटी काऊंसिलने तिच्यावर शहरात येण्यावर बंदी घालती होती. 

सिंगापूरमध्ये च्युइंग गमवर बंदी

सिंगापूरमध्ये येथील सरकारने २००४ मध्ये च्युइंग गमवर बंदी घातली आहे. याचं कारण शहरांमध्ये स्वच्छता ठेवण्यात अडचणी येतात. 

या शहरात निराशेवर बंदी

मिलान जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या देखरेखीखाली होतं तेव्हा तिथे एक नियम तयार करण्यात आला होता. या नियमानुसार, शहरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य गरजेचं होतं. केवळ अंत्यसंस्कार किंवा रूग्णायलयात असतानाच चेहऱ्यावर हसू नसल्यास दंड भरावा लागत नव्हता. आता हा नियम येथे नाहीये. 

पाश्चिमात्य हेअरस्टाइलवर बंदी

इराणमध्ये पाश्चिमात्य हेअरस्टाइलवर बंदी घालण्यात आली आहे. जर एखादं सलून या नियमाचं पालन करत नसेल तर त्या सलूनचं लायसन्स रद्द करण्यात येतं. 

ब्लू जीन्सवर बंदी

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने आपल्या देशात काही विचित्र बंदी लावल्या आहेत. तिथे ब्लू जीन्सवर यासाठी बंदी आहे कारण पाश्चिमात्य देशांचा तिथे प्रभाव होऊ नये.

ग्रीसमध्ये व्हिडीओ गेमवर बंदी

ग्रीस सरकारने ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कम्प्युटर आणि मोबाईल फोनवर चालणाऱ्या सर्वच इलेक्ट्रॉनिक गेम्सवर बंदी घातली आहे. कारण ग्रीस सरकार ऑनलाईन जुगार आणि इतर गेम्समध्ये फरक करत नाहीत.  पर्यटकांना मोबाईलमध्ये गेम्स ठेवणे चांगलेच महागात पडू शकते. 
 

Web Title: top 10 weird bans by governments around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.