सापांकडे खरंच 'नागमणि' असतो का? यावर विज्ञान काय म्हणतं, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:50 AM2024-03-27T10:50:53+5:302024-03-27T10:52:27+5:30

अशीही मान्यता आहे की, ज्यालाही हा नागमणि मिळतो त्याला खूप धन आणि समृद्धी मिळते. पण खरंच 'नागमणि' असतो का? यावर विज्ञान काय सांगतं ते जाणून घेऊ...

The myth of snake stones or black stones | सापांकडे खरंच 'नागमणि' असतो का? यावर विज्ञान काय म्हणतं, जाणून घ्या सत्य

सापांकडे खरंच 'नागमणि' असतो का? यावर विज्ञान काय म्हणतं, जाणून घ्या सत्य

अनेक जुने नवीन-सिनेमे किंवा टीव्हीवरील मालिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, सापांकडे नागमणि असल्याचं दाखवलं जातं. ते इच्छाधारी असल्याचंही दाखवलं जातं. काही लोकांमध्येही असा समज आहे की, सापांकडे खरंच नागमणि असतो. तसा दावाही केला जातो. असं म्हटलं जातं की, किंग कोब्रा सापाच्या डोक्यात एका वयानंतर नागमणि तयार होतो. ज्याला फार किंमत असते. अशीही मान्यता आहे की, ज्यालाही हा नागमणि मिळतो त्याला खूप धन आणि समृद्धी मिळते. पण खरंच 'नागमणि' असतो का? यावर विज्ञान काय सांगतं ते जाणून घेऊ...

काही लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, एका खास नक्षत्रादरम्यान किंग कोब्रा सापाच्या तोंडात पावसाचे थेंब गेल्यास नागमणि तयार होतो. नागमणि सापाच्या फणात तयार होतो. अशीही धारणा आहे की, साप कधीच नागमणि बाहेर काढत नाही.

Geologyin नुसार, सापांकडे नागमणि असतो यावर फार वाद आहेत. एक्सपर्टनुसार याला काहीच वैज्ञानिक आधार नाही. ही बाब लोककथा आणि अंधविश्वासातून समोर आली आहे.

वैज्ञानिकांनुसार, मनुष्यांप्रमाणे सापांमध्ये पित्ताचे स्टोन होतात. मोठ्या आकाराच्या स्टोनमधून दगडाचे तुकडे निघतात. अशात होऊ शकतं की, सापाच्या शरीरातून स्टोनमुळे तयार होणारा दगड निघाला असेल आणि याला मणि समजण्यात आलं असेल. नंतर हा समज लोकांमध्ये पसरला असेल.

SCI-ART LAB वर प्रकाशित एका रिपोर्टमध्ये डॉ. कृष्णा कुमारी छल्ला यांनीही नागमणि असल्याच्या दाव्याचं खंडन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, नागमणि किंवा वायपर स्टोन किंवा स्नेक पर्ल सारख्या काही गोष्टी नसतात. हे एक प्राण्याचं हाड असतं किंवा चमकदार दगड असतो ज्याचा वापर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत आणि इतर देशांमध्ये सापाने दंश मारल्यावर औषधी म्हणून वापरला जातो. 14व्या शतकापासून ही परंपरा चालत आली आहे आणि लोकांनी याला नागमणि असल्याचं सांगितलं.

Web Title: The myth of snake stones or black stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.