या छोट्याशा जीवाला असतात 25 हजार दात, इतर गोष्टीही वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:24 PM2024-03-18T16:24:20+5:302024-03-18T16:24:46+5:30

तुम्हाला हे माहीत नसेल की, या छोट्याशा जीवाला दहा-बारा नाही तर तबब्ल 25 हजार दात असतात.

Snail small creature has 25 thousand teeth | या छोट्याशा जीवाला असतात 25 हजार दात, इतर गोष्टीही वाचून व्हाल अवाक्...

या छोट्याशा जीवाला असतात 25 हजार दात, इतर गोष्टीही वाचून व्हाल अवाक्...

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. त्यांचं त्यांचं वेगळेपण आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा जीवाबाबत सांगणार आहोत ज्याला 25 हजार दात असतात.
बऱ्याच लोकांनी गोगलगाय तर नक्कीच पाहिली असेल. गोगलगाय जगातील सगळ्यात हळुवार चालणाऱ्या जीवांपैकी एक आहे. सामान्यपणे गोगलगायी रात्रीच्या वेळी सक्रिय होतात आणि अन्नाच्या शोधात निघतात. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, या छोट्याशा जीवाला दहा-बारा नाही तर तबब्ल 25 हजार दात असतात.

ऐकायला थोडं अजब वाटू शकतं कारण यांचा आकार लहान असतो आणि इतके दात कसे असू शकतात असा प्रश्नही पडू शकतो. पण हे सत्य आहे की, गोगलगायीचं तोंड एखाद्या पिनीच्या आकारा इतकं असतं. यात 25 हजार इतके दात असू शकतात. सांयन्स फॅक्टनुसार, गोगलगायीचे दात सामान्य दातांप्रमाणे नसतात. ते त्यांच्या जीभेवर असतात. ते एखाद्या कंगव्यासारखे दिसतात.

गोगलगायीचं वैज्ञानिक नाव Gastropoda आहे. यांचं मुख्य जेवण माती, पाने-फुले आहेत. गोगलगायींचं सरासरी जीवन 20 वर्षाच्या आसपास असतं. हे जास्तकरून दलदल, झाडांवर, पाण्यात किंवा गवतांच्या मैदानात दिसतात.

त्याशिवाय गोगलगायींचं शरीर जेवणं मुलायम असतं. त्यांच्या शरीराचा बाहेरील भाग तेवढाच टणक असतो. ज्याला शेल म्हटलं जातं. जगभरात मुख्यत्वे तीन प्रजातीच्या गोगलगायी बघायला मिळतात. आफ्रिकन स्नेल, रोमन स्नेल आणि गार्डेन स्नेल. रंगावरून यांचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. 

इतकंच नाही तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये गोगलगायी चवीने खाल्ल्या जातात. यांच्यापासून अनेक फेमस डिश तयार होतात. त्याशिवाय चीन, हॉंगकॉंग, व्हिएतनामसारख्या देशांमध्ये हे पाळले जातात किंवा असंही म्हणता येईल की, यांची शेती केली जाते. बाजारातहे 400 ते 600 रूपये किलो भावाने विकले जातात.

Web Title: Snail small creature has 25 thousand teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.