Ranvir Singh's Khalivali dance on Marathi songs, Video Viral on social media | 'बघ बघ अगं सखे कसं', मराठी गाण्यावर थिरकला 'खलिवलि' रणवीर सिंह
'बघ बघ अगं सखे कसं', मराठी गाण्यावर थिरकला 'खलिवलि' रणवीर सिंह

मुंबई- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा अनेक वादानंतर प्रदर्शित झाला. पद्मावत सिनेमा बॉक्सऑफिसवर तसंच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादूकोणने साकारलेली राणी पद्मावतीची भूमिका, अभिनेता शाहिद कपूरने साकारलेली राजा रतनरावल सिंहची भूमिका व अभिनेता रणवीर सिंहने साकारलेली अलाउद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका या सगळ्याचं भरभरून कौतुक होत आहे. सिनेमाबद्दलचं विशेष म्हणजे अभिनेता रणवीर सिंहचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून राहीला आहे. रणवीरची भूमिका निगेटीव्ह असली तर त्याच्या अभिनय शैलीचं जोरादार कौतुक होत आहे.

सिनेमात रणवीरचे डायलॉग, त्याच्या गाण्यांमधील डान्सला तर फॅन्सने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. सिनेमातील असंच एक 'खलिवलि' गाण्याचा व्हिडीओ मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. सिनेमागृहात प्रेक्षकांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. पण यामधील एक गंमत म्हणजे रणवीर सिंगच्या या डान्सवर विविध प्रयोग करण्यात आले आहेत. रणवीर सिंग चक्क मराठी गाण्यावर डान्स करताना या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलं आहे. जोगवा सिनेमाती 'लल्लाटी भंडार' हे गाणं, बघ बघ अगं सखे कसं, अशा विविध गाण्यावर रणवीरचा डान्स एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या नव्या व्हिडीओला सोशल मीडियावर युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. विशेष म्हणजे 'खलिवलि' गाण्यातील रणवीरच्या डान्स स्टेप या गाण्यावर हुबेहुब एडिट करण्यात आल्या आहेत. फेसबुकवर हे व्हिडीओ बघणारा प्रत्येक जण त्याच्या मित्र-मैत्रिणींना कमेंटमध्ये टॅग करून व्हिडीओ बघायला सांगतो आहे. त्यामुळे या नव्या गाण्याची क्रेझ जास्त वाढली आहे.

खलिवलि या गाण्यावरून तयार केलेले नवीन व्हिडीओ रणवीरने पाहिल्यानंतर तो यावर काय कमेंट देणार हे पाहणं विशेष असेल. 


Web Title: Ranvir Singh's Khalivali dance on Marathi songs, Video Viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.