माझ्या राजा चिवी, तुला सोडून जायची इच्छा नाही पण...

By admin | Published: July 8, 2017 12:44 AM2017-07-08T00:44:56+5:302017-07-08T00:44:56+5:30

निराश झालेली महिला तिच्या आवडत्या तीन महिन्यांच्या कुत्र्याचे पिल्लू चिवी विमानतळावर सोडून विमानाने निघून गेली. हे पिल्लू तिला

My King Chivi, do not want to leave you, but ... | माझ्या राजा चिवी, तुला सोडून जायची इच्छा नाही पण...

माझ्या राजा चिवी, तुला सोडून जायची इच्छा नाही पण...

Next

लंडन : निराश झालेली महिला तिच्या आवडत्या तीन महिन्यांच्या कुत्र्याचे पिल्लू चिवी विमानतळावर सोडून विमानाने निघून गेली. हे पिल्लू तिला असे निराधार सोडून द्यायचे नव्हते. तिने ‘माझ्यापुढे दुसरा पर्यायच उरला नव्हता’, लिहून ठेवलेल्या हृदयस्पर्शी चिठ्ठीत म्हटले. चिठ्ठीत तिने लिहिले आहे की, ‘माझा घरगुती छळ झाला असून या पिल्लाला विमानातून घेऊन जाण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत. चिवीच्या डोक्यावर मोठे टेंगूळ आले असून माझ्या पूर्वीच्या मित्राशी झालेल्या भांडणात मित्राने चिवीला लाथ मारल्यामुळे ते आले आहे.’ अमेरिकेतील लास वेगास येथील मॅककॅरॅन इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्वच्छतागृहात चिवी आढळला. तेथेच ही महिला घाईघाईने का निघून जात आहे हे सांगणारी ती चिठ्ठीही होती. चिठ्ठी जणू काही चिवीच्या आवाजात आहे : ‘‘नमस्कार, मी चिवी. माझ्या मालकिणीला त्रास सोसावा लागत असून ती मला तिच्यासोबत विमानात पैशांअभावी घेऊन जाऊ शकत नाही. खरे तर मला सोडून जायची तिची इच्छा नाही परंतु तिच्यापुढे दुसरा पर्याय नाही.’
मी आणि माझा पूर्वीचा मित्र भांडत असताना मित्राने माझ्या पिल्लाला लाथ मारली व त्यामुळे त्याच्या डोक्यावर टेंगूळ आले. त्याला बहुधा जनावरांच्या डॉक्टरांकडे न्यावे लागेल. माझे चिवीवर खूप प्रेम आहे. त्याला कृपया प्रेमाने सांभाळा, असे ही महिला त्यात म्हणते. चिठ्ठीच्या शेवटी फुल्या फुल्या मारण्यात आल्या आहेत. चिवीला लास वेगासमधील विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी कोन्नी
अँड मिलीज् डॉग रिस्क्यू विभागाकडे सोपवले आहे.

Web Title: My King Chivi, do not want to leave you, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.