HIV Positive लोकांकडून चालवला जाणारा देशातील पहिला कॅफे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:16 PM2019-03-18T12:16:41+5:302019-03-18T12:25:14+5:30

व्यक्ती कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारांपासून भीती वाटते. हा व्यक्तीचा स्वभावच आहे. असाच एक आजार म्हणजे HIV.

This Kolkata cafe positive run by HIV positive | HIV Positive लोकांकडून चालवला जाणारा देशातील पहिला कॅफे! 

HIV Positive लोकांकडून चालवला जाणारा देशातील पहिला कॅफे! 

googlenewsNext

(Image Credit - Zee News)

व्यक्ती कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारांपासून भीती वाटते. हा व्यक्तीचा स्वभावच आहे. असाच एक आजार म्हणजे HIV. या आजाराची भीती आपल्या समाजात फार जास्त पसरली आहे. पण हा आजार कुणाला स्पर्श केल्याने किंवा त्या व्यक्तीसोबत जेवण केल्याने परसत नाही. हेच सांगण्यासाठी कोलकातामध्ये एका कॅफेची सुरूवात करण्यात आली आहे. हा कॅफे HIV पॉझिटिव्ह लोक चालवतात. महत्त्वाची बाब म्हणजे हा भारतातील अशाप्रकारचा पहिला कॅफे आहे. 

कोलकातामधील या कॅफेचं नाव 'कॅफे पॉझिटिव्ह' असं आहे. हा कॅफे एका एनजीओने सुरू केला आहे. या एनजीओने एचआयव्हीसंबंधी समाजातील लोकांमध्ये परसलेले गैरसमज दूर करण्यासाठी या कॅफेची सुरूवात केली आहे. 

(Image Credit : The Hindu)

'कॅफे पॉझिटिव्ह' चे फाउंडर Kallol Ghosh हे आहेत. त्यांनी सांगितले की, या कॅफेमध्ये १० एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक काम करतात. हे लोक अकाऊंट बघणे, ग्राहकांना सेवा देणे हे काम करतात. किचनमध्ये वेगळे लोक काम करतात.

हा कॅफे सुरू करण्याचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये एचआयव्हीबाबत असलेले गैरसमज दूर करणे हा आहे. या कॅफेचं अनेकजण कौतुक करत आहेत. इथे येणाऱ्या ग्राहकांना हे आधीच माहीत असतं की, इथे HIV पॉझिटिव्ह लोक काम करतात. लोक आता काही प्रमाणात याबाबत जागरूक होत आहेत. 

खरंतर अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे HIV बाधित लोकांना जगण्याची एक नवीन किरण मिळण्यास मदत होते. तसेच त्यांना समाजात मान वर करून जगण्याचीही दिशा मिळते. त्यामुळे अशाप्रकारचे उपक्रम आणखी व्हावे, ही अपेक्षा आपण करू शकतो.

Web Title: This Kolkata cafe positive run by HIV positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.