iranian woman sahar tabar undergoes 50 surgeries to look like angelina jolie | अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी 50 वेळा केली सर्जरी, पण झालं काहीतरी भलतंच

ठळक मुद्देआपल्या आवडत्या सिनेकलाकारासाठी दिसण्याची प्रत्येकाला आवड असते. त्या आवडत्या कलाकारासारखे कपडे, तसा लूक करण्याचा प्रयत्नही अनेक जण करताना दिसतात. आवडत्या फिल्मस्टारसारखं दिसण्यासाठी तेथिल एका तरूणीने तब्बल 50 वेळा सर्जरी केली आहे. विशेष म्हणजे एवढ्या वेळा सर्जरी केल्यामुळे चेहरा विद्रूप होण्याची वेळही या मुलीवर आली आहे. 

तेहरान- आपल्या आवडत्या सिनेकलाकारासाठी दिसण्याची प्रत्येकाला आवड असते. त्या आवडत्या कलाकारासारखे कपडे, तसा लूक करण्याचा प्रयत्नही अनेक जण करताना दिसतात. आवडत्या सेलिब्रेटीचं स्टाईल स्टेटमेंट काय आहे? याकडे लक्ष देऊन ते स्टाईल फॉलोही केलं जातं. एखाद्या कलाकाराची स्टाईल फॉलो करण्यापर्यंतच काही जण थांबत नाहीत. असाचं एक प्रकार इराणमध्ये घडला आहे. आवडत्या फिल्मस्टारसारखं दिसण्यासाठी तेथिल एका तरूणीने तब्बल 50 वेळा सर्जरी केली आहे. विशेष म्हणजे एवढ्या वेळा सर्जरी केल्यामुळे चेहरा विद्रूप होण्याची वेळही या मुलीवर आली आहे. 

हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी या मुलीनं ५० हून अधिक सर्जरी केल्या आहेत. इतक्या सर्जरी करून ती काही अँजेलिनासारखी दिसलीच नाही, पण तिचा चेहरा मात्र विद्रुप झाला आहे. ‘डेली मेल’नं दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सहार तबार आहे. ती 22 वर्षांची आहे. अँजेलिना जोलीची ती चाहती आहे, म्हणूनच तिच्यासारखं दिसण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. पण काहींच्या मते तिचं हे रुप सर्जरीचा परिणाम नसून मेकअपची कमाल असल्याचं म्हटलं जात आहे. 

सहारच्या फोटोवर अनेकांनी कमेन्ट केल्या आहेत. काहींनी तिचा हा लूक सकारात्मकपणे घेतला तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे.