प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळ्या प्रकारची ताकद असते आणि प्रत्येक व्यक्तीची काहीतरी कमजोरी असते. तुमची कमजोरी तुमच्या यशात अडथळा ठरते. पण अनेकांना आपल्या कमजोरीवर मात करत यश मिळवायचं असतं. तर काही अशी लोकं असतात जी आपल्या कमजोरीला आपली सर्वात मोठी ताकद बनवतात.   

अंपग व्यक्तीकडे बघून आपण त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवतो. पण आपण विचारही करु शकत नाही की, असे लोक त्यांचं दैनंदिन जीवन कसं जगत असतील. मात्र, आपण हे विसरतोय की, अशा लोकांकडे आपल्यापेक्षाही जास्त गुण असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची आणि धैर्याची जराही कमतरता नसते. अशीच एका इरानियन महिलेची प्रेरणादायी कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊऩ आलो आहोत. 

ही आहे फातेमा हमामी. फातेमाला 85 टक्के अंपंगत्व आहे. पण तिने तिच्या अपंगत्वावर मात करत आपली कला जोपासली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. पण फातेमा तिच्या हाताने नाहीतर तिच्या पायाने पेंटींग करते.  

फातेमा सध्या तिच्या या कलेमुळे सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने केलेल्या एकापेक्षा एक सुंदर कलाकृती ती शेअर करते आणि अनेकजण याचं कौतुक करुन तिला यासाठी आणखी प्रोत्साहन देतात. 


Web Title: Iranian Woman With 85 percent Disability Paints With Her 2 Toes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.