कमी उंचीच्या लोकांसाठी खास चष्मा, गर्दीत मागे उभे राहूनही बघू शकतील कार्यक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:47 PM2019-06-10T16:47:38+5:302019-06-10T16:55:02+5:30

कमी उंची असलेले लोक नेहमीच गर्दी समोर उभे असलेल्या लोकांना मागे करतात आणि ते पुढे निघून जातात.

Inventor periscope glasses short people tall gig festivals | कमी उंचीच्या लोकांसाठी खास चष्मा, गर्दीत मागे उभे राहूनही बघू शकतील कार्यक्रम!

कमी उंचीच्या लोकांसाठी खास चष्मा, गर्दीत मागे उभे राहूनही बघू शकतील कार्यक्रम!

Next

(Image Credit : www.dezeen.com)

कमी उंची असलेले लोक नेहमीच गर्दी समोर उभे असलेल्या लोकांना मागे करतात आणि ते पुढे निघून जातात. वेगवेगळ्या म्युझिक इव्हेंटमध्ये आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण हे बघत असतो की, कमी उंचीच्या लोकांना समोरचं बघण्यात अडचण येते. मग ते गर्दीतून मार्ग काढत पुढे जातात. पण आता कमी उंचीच्या लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी इंग्लंडच्या एका वैज्ञानिकाने एक जबरा उपाय शोधून काढला आहे.

(Image Credit : www.dezeen.com)

इंग्लंडच्या डोमनिक विलकॉक्स यांनी 'पेरिस्कोप ग्लासेस'ची एक जोडी तयार केली आहे. डोमनिकने या ग्लासेसला 'वन फुट टॉलर' असं नावं दिलं आहे. या ग्लासेसमुळे गर्दीत समोर उंच लोक जरी उभे असले तरी कमी उंचीचे लोक समोरचं सगळं बघू शकणार आहेत. डोमनिकने हे ग्लासेस एका महिलेला बघून तयार केले होते. ही महिला तेव्हा बॅंडला न बघता डान्स करत होती.

(Image Credit : www.dezeen.com)

डोमनिकने सांगितले की, 'जेव्हा मी कार्यक्रम बघत होतो, तेव्हा एक कमी उंचीची महिला बॅंड दिसत नसतानाही डान्स करत होती. ती तिच्या कमी उंचीमुळे म्युझिक प्रोग्राम बघू शकत नव्हती'. त्यांनी सांगितले की, 'पेरिस्कोप ग्लासेस' चांगल्याप्रकारे काम करतात. यांच्या मदतीने तुम्ही मागे उभे राहूनही समोरचा कार्यक्रम स्पष्टपणे बघू शकाल.

(Image Credit : www.dezeen.com)

ते पुढे म्हणाले की, 'पेरिस्कोप ग्लासेसचं डिझाइन ४५ डिग्रीच्या मोडसोबत ऐक्रेलिकच्या शीटचा वापर करून तयार करण्यात आलं आहे. या छोट्या चष्म्यामध्ये लावलेले ग्लासेस मागे उभे राहूनही तुम्हाला समोरचा कार्यक्रम दाखवू शकतात. त्यांनी हे ग्लासेस कमी उंचीच्या लोकांना गर्दीतही समोर काय सुरू आहे बघता यावे म्हणून तयार केले आहेत.

Web Title: Inventor periscope glasses short people tall gig festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.