पृथ्वीवरील एक ठिकाण जे अंतराळापासून सर्वात जवळ आहे, अजूनही कुणी पोहोचलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:33 PM2024-02-05T12:33:12+5:302024-02-05T12:34:05+5:30

Point Nemo : आज आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे कुणी राहत नाही किंवा असंही म्हणता येईल की, इथे आजपर्यंत पोहोचलं नाही.

Interesting Facts : Place on earth is closest to space no one ever reached there amazing facts | पृथ्वीवरील एक ठिकाण जे अंतराळापासून सर्वात जवळ आहे, अजूनही कुणी पोहोचलं नाही!

पृथ्वीवरील एक ठिकाण जे अंतराळापासून सर्वात जवळ आहे, अजूनही कुणी पोहोचलं नाही!

Point Nemo : अनेकदा काही लोकांच्या डोक्यात विचार येत असेल की, एखाद्या अशा ठिकाणी जावं जिथे तुम्हाला कुणी ओळखत नाही किंवा तुमच्याशी बोलणार नाही. पण सामान्यपणे सगळीकडे लोकच लोक असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे कुणी राहत नाही किंवा असंही म्हणता येईल की, इथे आजपर्यंत पोहोचलं नाही.

पृथ्वीपासून अंतराळाचं अंतर किती आहे आणि तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो हे जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. तुम्हाला कदाचित या ठिकाणाबाबत माहीत नसेल जिथून पृथ्वी आणि अंतराळाचं अंतर फार कमी होतं. या ठिकाणावर पोहोचणं फार अवघड आहे आणि अंतराळात जाणं सोपं.

आज आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत. याला म्हणतात  पॉइंट निमो. इथून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि तिथे राहणारे अंतराळवीर केवळ 250 मैलाच्या अंतरावर राहतात. याच्या सगळ्यात जवळ पृथ्वीवरील सगळ्यात कोरडी जमीन आहे वो ड्यूसी नावाचं छोटं बेट आहे. विचार करा इथून ड्यूसी बेट 1600 मैलापेक्षाही जास्त अंतरावर आहे, पण अंतराळ केवळ 250 मैलावर आहे. येथील वातावरण खूप भयावह असतं आणि डोंगरांच्या तुटण्याच्या आवाजाने अंगावर शहारे येतात.

लॅडबायबलच्या रिपोर्टनुसार, या ठिकाणार 1971 पासून ते 2016 दरम्यान 260 पेक्षा अंतराळ यान दफन करण्यात आले आहेत. याला अंतराळ यानांची स्मशाणभूमीही म्हटलं जातं. याचं नामकरण कॅप्टन निमोच्या नावावर करण्यात आलं होतं. या ठिकाणाचा शोध एक सर्वे इंजिनिअर Hrvoje Lukatela ने लावला होता. प्रशांत महासागरात असलेल्या या सगळ्यात वेगळ्या ठिकाणाला पृथ्वीचा सगळ्यात रिमोट एरिया मानला जातो. जेव्हा एखादं अंतराळ यान किंवा स्टेशनमध्ये काही बिघाड होतो तेव्हा त्याला इथे आणून टाकलं जातं.

Web Title: Interesting Facts : Place on earth is closest to space no one ever reached there amazing facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.