जर एखाद्याच्या बोलण्या-वागण्याने होत असाल बोअर तर असे करा इग्नोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 03:12 PM2018-07-09T15:12:17+5:302018-07-09T15:59:18+5:30

आता तो व्यक्ती ओळखीचा असल्याने त्या थेट ‘तू बोअर करतोय!’ असे म्हणताही येत नाही. अशात त्या अडचणीतून बाहेर कठिण होऊन बसतं.

Ignore such things to someone very bored | जर एखाद्याच्या बोलण्या-वागण्याने होत असाल बोअर तर असे करा इग्नोर

जर एखाद्याच्या बोलण्या-वागण्याने होत असाल बोअर तर असे करा इग्नोर

googlenewsNext

आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावांचे लोक भेटत असतात. या विविधरंगी लोकांमध्ये काही लोक चांगले असतात तर काही रिकामेच आपल्याला बोअर करत असतात. ते त्यांच्या रटाळ गोष्टींनी आपला मूड बेकार करीत असतात. आता तो व्यक्ती ओळखीचा नसल्याने त्याला थेट ‘तू बोअर करतोय!’ असे म्हणताही येत नाही. अशात त्या अडचणीतून बाहेर कठिण होऊन बसतं.

जर समोरच्या व्यक्तीला हर्ट न करता त्या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर काही खास टिप्स तुम्हाला वापरावे लागतील. ज्याने ना समोरचा व्यक्ती हर्ट होईल ना तुम्हाला कशाचे वाईट वाटेल. पण त्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. ज्याने तुम्हाला अशा परिस्थीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल.

आय  कॉन्टॅक्ट  करा  कमी :

जेव्हाही तुम्ही दुस-या व्यक्तीचं ऎकत असता तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे घालून ऎकत असतात. पण जेव्हा एखाद्याचं बोलणं तुम्हाला पटकन संपवायचं असेल तर कमीत कमी आय कॉन्टॅक्ट करा. जेणेकरून समोरच्याला हिंट मिळेल की, तुम्ही घाईत आहात आणि हे बोलणं नंतरही होऊ शकतं

सतत  स्माईल  करा :

जर समोरच्या व्यक्तीचं बोलणं पटकन थांबवायचं असेल तर सतत स्माईल करत रहा. जेणेकरून तुम्हालाही बोलण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचं बोलणं करता करता आरामात तेथून सटकू शकाल.

मान  हलवून हो हो  म्हणत रहा :

जनरली असे तेव्हा केले जाते जेव्हा तुम्ही कुणाच्या बोलण्यावर सहमती दर्शवत असता. पण जर बोलणं संपवायचं असेल तर लवकर लवकर मान हलवून तुम्ही समोरच्याचं बोलणं थांबवू शकता.

स्टॉप  रिस्पॉन्डिंग :

यातील कोणत्याही इशा-याचा समोरच्या व्यक्तीवर काही परिणाम होत नसेल तर त्याला रिस्पॉन्ड करणं बंद करा. आता तर त्याच्या नक्कीच लक्षात येईल की, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं किंवा काय हवंय.

Web Title: Ignore such things to someone very bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.