पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:21 PM2023-05-15T12:21:06+5:302023-05-15T12:22:11+5:30

पतीचा आरोप आहे की, पत्नी दारू पिते. दारू पिऊन त्याला शिव्या देते आणि भर चौकात धिंगाणा घालते.

Husband alcohol addiction the wife became an alcoholic in Agra UP | पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ!

पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ!

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या आग्रामधून पती-पत्नीच्या वादाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. वादानंतर पती-पत्नी काउंसेलिंगसाठी गेले होते. तेव्हा पती-पत्नीने एकमेकांवर दारोडे असण्याचा आरोप केला होता. पतीचा आरोप आहे की, पत्नी दारू पिते. दारू पिऊन त्याला शिव्या देते आणि भर चौकात धिंगाणा घालते.

पुरावा म्हणून त्याने काउंसेलरला व्हिडीओ सुद्धा दाखवला. व्हिडिओत पती घाबरून पळत होता आणि पत्नी त्याला शिव्या देत होती. पतीने जेव्हा त्याची बाजू मांडली तेव्हा पत्नीने तिचं म्हणणं सांगितलं. पत्नीने सांगितलं की, पती रोज दारू पिऊन घरी येत होता. घरी येताच नवनवीन कारणांनी तिला मारहाण करत होता. तिला त्रास देत होता.

रोजरोजच्या मारहाणीला कंटाळून तिने दारू पिल्याची अ‍ॅक्टिंग केली. पतीला त्याच्याच भाषेत धडा शिकवणं सुरू केलं. पत्नीनुसार ती कधीच दारू प्यायली नाही. पण पतीची नशा उतरवण्यासाठी तिला दारू प्यायल्याची अ‍ॅक्टिंग करावी लागली. दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर काउंसेलर यांनी दोघांमध्ये एक लिखित करार केला.

पतीला सांगण्यात आलं आहे की, त्याने दारू पिऊ नये. पतीने हे लिहून दिलं की, तो केवळ आठवड्यातून एकदाच दारू पिणार. पत्नीला मारहाण करणार नाही. लिखित करार झाल्यानंतर पती-पत्नी एकत्र घरी गेले. पती-पत्नीच्या या वादाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Web Title: Husband alcohol addiction the wife became an alcoholic in Agra UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.