बॉयफ्रेन्डशी लग्नासाठी तरूणीचा शोले स्टाइल राडा, मोबाइल टॉवरवर चढून म्हणाली, गांववालों.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 03:06 PM2019-03-07T15:06:52+5:302019-03-07T15:19:23+5:30

'शोले' सिनेमातील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरून चढून 'गांववालों' हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

Girl climbs mobile tower demanding marriage with lover in Andhra Pradesh | बॉयफ्रेन्डशी लग्नासाठी तरूणीचा शोले स्टाइल राडा, मोबाइल टॉवरवर चढून म्हणाली, गांववालों.....

बॉयफ्रेन्डशी लग्नासाठी तरूणीचा शोले स्टाइल राडा, मोबाइल टॉवरवर चढून म्हणाली, गांववालों.....

googlenewsNext

(Image Credit : Amar Ujala)

'शोले' सिनेमातील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरून चढून 'गांववालों' हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हा डायलॉग आजही चांगलाच लोकप्रिय आहे. बसंतीसोबत लग्न लावून द्या नाही तर खाली उडी घेईन अशी धमकी वीरू या सिनेमातून देतो. असंच एक आंध्र प्रदेशातील वारंगल गावात घडली आहे. पण यावेळी एखादा पुरूष नाही तर एक तरूणी चक्क टॉवरवर चढली. आणि तिचं म्हणणं गावातील लोकांना मान्य करावं लागलं. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बॉयफ्रेन्डसोबत लग्न करण्यासाठी या तरूणीने शोले स्टाइल राडा केला. तिच्या या राड्याने गावातील सर्व लोक हैराण झाले होते. झालं असं की, वारंगल गावातील २१ वर्षीय तरूणीला तिच्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी तिने तिचा जीव धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतला. या तरूणीचा बॉयफ्रेन्ड गेल्या काही दिवसांपासून गायब होता. त्यामुळे तरूणी फारच दु:खी होती. 

दरम्यान बॉयफ्रेन्डला शोधण्यासाठी तरूणीने पोलिसांकडेही तक्रार दिली होती. पण तिला त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तरूणीने स्वत:च धक्कादायक पाऊल उचललं. हे पाहून पोलिसांसोबतच गावातील लोकही हैराण झाले.

आपल्या फरार बॉयफ्रेन्डची माहिती मिळवण्यासाठी आणि त्याला मिळवण्यासाठी तरूणीने मोबाइल टॉवरवर चढून प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. हे करण्याआधी तरूणीने आधी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तिने त्यांना सांगितले की, लवकरात लवकर माझ्या बॉयफ्रेन्ड शोधून काढा आणि वेळ न दडवता आमचं लग्न लावून द्या. 

(प्रातिनिधीक फोटो - फोटो साभार Philly's 7th Ward)

अशातच तरूणीला हे कळालं की, तिच्या बॉयफ्रेन्डच्या घरातील लोकांनी त्याचं लग्न एका दुसऱ्या मुलीशी जुळवलं आहे. हे माहिती होताच ती आणखीन संतापली. तिने पोलिसांना आणि गावकऱ्यांना थेट धकमी दिलीय 

तरूणी म्हणाली की, तिला त्याच मुलासोबत लग्न करायचं आहे, ज्याच्यावर तिचं प्रेम आहे. असं झालं नाही तर ती टॉवरवरून उडी घेऊन आत्महत्या करेल. पण जेव्हा या गोष्टी माहिती स्टुडेंट यूनियन आणि महिला आयोगाला मिळाली तेव्हा सगळे घटनास्थळी पोहोचले. तिला खाली उतरण्याची विनंती केली गेली. नंतर पोलिसांनी तिला मोठ्या प्रयत्नांनंतर खाली उतरवले. 

मजेदार बाब ही आहे की, यानंतर लगेच तिच्या बॉयफ्रेन्डचा शोधही घेण्यात आला होता. नंतर स्टुडेंट यूनियम आणि महिला आयोगाच्या महिला दोघांच्या लग्नाची मागणी घेत त्यांच्या परिवाराविरोधात आंदोलन करू लागले होते. पोलिसांनी फार समजावल्यानंतर दोघांच्याही परिवारातील सदस्यांनी दोघांचं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनबाहेरच दोघांचं लग्न लावून देण्यात आलं आहे. 
 

Web Title: Girl climbs mobile tower demanding marriage with lover in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.