PNB scam: सोशल मीडियावर 'छोटा मोदी’ आणि 'फाईंडिंग निमो' ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 01:25 PM2018-02-17T13:25:43+5:302018-02-17T13:29:32+5:30

नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे.

Finding NiMo and Chota Modi Social Media after PNB scam | PNB scam: सोशल मीडियावर 'छोटा मोदी’ आणि 'फाईंडिंग निमो' ट्रेंडमध्ये

PNB scam: सोशल मीडियावर 'छोटा मोदी’ आणि 'फाईंडिंग निमो' ट्रेंडमध्ये

googlenewsNext

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीमुळे सत्ताधारी भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. या घोटाळ्यानंतर विरोधकांसह सोशल मीडियावर होत असलेल्या खोचक टीकेने भाजपाचे नेते चांगलेच बेजार झाले आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळात विरोधकांकडून भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करायला विरोधक काहीसे कचरत होते. सोशल मीडियावरही मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानपदाभोवती जे वलय निर्माण झाले होते, त्या भीतीने का होईना, नरेंद्र मोदींची थट्टा करायला नेटिझन्स बिचकत असत. मात्र, नीरव मोदीचा घोटाळा बाहेर आल्यापासून विरोधक आणि नेटिझन्स दोघेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. यापूर्वी बेहिशेबी संपत्तीचे आरोप झाल्यानंतर फरार झालेला ललित मोदी आणि नीरव मोदी यांच्या आडनावाशी असलेल्या नामसार्धम्यामुळे नरेंद्र मोदी कधी नव्हे इतके अडचणीत आले आहेत. मोदी या प्रकरणानंतर गप्प आहेत. त्यामुळे सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्याचे नीरव मोदीला अभय तर नाही ना? असा प्रश्न विरोधकांसह देशातील जनताही विचारत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नीरव मोदी प्रकरणावरून मोदींवर निशाणा साधला होता. ‘मोदींना मिठी मारा आणि १२ हजार कोटी लुटा, हा फरार मोदी दाव्होसमध्ये पंतप्रधानांसोबत दिसला आणि त्यांच्याशी असलेल्या संबधांचा वापर करून तो देशाबाहेर पळाला. ‘ अशी टीका केली त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या फरार नीरव मोदीचं नामकरण ‘छोटा मोदी’ केलं आहे.  या प्रकरणावर मौन बाळगून असलेले पंतप्रधान मोदी आणि फसवणूक केलेल्या नीरव मोदीवर ‘#छोटा_मोदी’ हा हॅशटॅश वापरून ट्विपल्स टीका करत आहेत. तर 'फाईंडिंग नीमो' या अॅनिमेटेड चित्रपटाच्या पोस्टरचे विडंबन करूनही 'मोदी' फॅक्टर अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सगळी टीका करताना नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे. एरवी राजकीय विरोधकांच्या शेलक्या टीकेला तत्त्परतेने प्रत्युत्तर देणाऱ्या भाजपा नेते सोशल मीडियावरील आरोपांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. 





















ये चारों 'P' ने देश मे भूचाल मचा दिया है ।
प्रिया
पकोड़ा
पदमावत
पंजाब नेशनल बैंक

Web Title: Finding NiMo and Chota Modi Social Media after PNB scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.