कोर्टाने सुनावली होती ५० वर्षांची शिक्षा, श्वानाच्या मदतीने असा ठरला हा व्यक्ती निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:59 PM2018-09-18T13:59:25+5:302018-09-18T14:01:12+5:30

श्वान हे आपल्या मालकांसोबत इमानदार असतात याची अनेक उदाहरणं तुम्ही वाचली, पाहिली असतील. कधी कधी तर हे श्वान मालकांसोबत न राहूनही त्यांच्या जीव वाचवतात.

dog saves man from serving 50 years jail term | कोर्टाने सुनावली होती ५० वर्षांची शिक्षा, श्वानाच्या मदतीने असा ठरला हा व्यक्ती निर्दोष

कोर्टाने सुनावली होती ५० वर्षांची शिक्षा, श्वानाच्या मदतीने असा ठरला हा व्यक्ती निर्दोष

Next

श्वान हे आपल्या मालकांसोबत इमानदार असतात याची अनेक उदाहरणं तुम्ही वाचली, पाहिली असतील. कधी कधी तर हे श्वान मालकांसोबत न राहूनही त्यांच्या जीव वाचवतात. असंच एक प्रकरण वॉशिंग्टनमध्ये समोर अलां आहे. इथे एका श्वानामुळे जोशुआ हार्नर नावाचा एक व्यक्ती त्याला मिळणाऱ्या ५० वर्षांच्या शिक्षेतून बचावला. हा व्यक्ती आपल्याच मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ५० वर्षांची शिक्षा भोगत होता. 

वॉशिंग्टनच्या रेडमॉन्ड शहरातील जोशुआ हार्नर हा व्यक्ती १७ महिन्यांची शिक्षा भोगून बाहेर आला आहे आणि तेही एका श्वानामुळे. २०१७ मध्ये हार्नरच्या मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीने आरोप लावला होता की, वडिलांनी २००६ पासून ते २०१३ पर्यंत अनेकदा लैंगिक शोषण केलं. इतकंच नाही तर मुलीने आपल्या आरोपात हेही सांगितलं होतं की, वडील तिला जबरदस्तीने पॉर्न सिनेमेही दाखवत होते. तिने सांगितले की, २०१४ मध्ये वडिलांनी धमकी दिली होती की, जर तिने याबाबत कुणाक़डे काही सांगितलं तर तिच्या श्वानाला ते ठार करतील. 



 

नंतर मुलीने कोर्टात आपल्या जबाबात सांगितले की, एक दिवस हॉर्नर जेव्हा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तिने त्याचा विरोध केला. त्यानंतर हॉर्नर म्हणजेच तिच्या वडिलाने तिच्या श्वानाला गोळी घालून ठार केले. पण श्वानाच्या हत्येचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र त्यावेळी मुलीने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत कोर्टाने हॉर्नरला ५० वर्षांची शिक्षा सुनावली होती.  



 

तुरुंगात राहत असताना आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी हॉर्नरने ऑरेगॉन इनोसेन्स प्रोजेक्ट या संस्थेशी संपर्क केला आणि त्यांना श्वानाबाबत सांगितले. हॉर्नरने श्वान आपल्या एका मित्राला विकले होते. पण आता त्याला मित्राचा पत्ता माहीत नव्हता. मात्र संस्थेच्या लोकांनी मोठ्या मेहनतीने त्याच्या मित्राचा पत्ता शोधून काढला. हॉर्नरने जसे श्वानाबाबत सांगितले होते तसेच आढळते. म्हणजे मुलीने कोर्टात खोटे सांगितले होते. श्वान जिंवत होता. 

श्वान मिळाल्यानंतर हे प्रकरण स्पष्ट झालं. म्हणजे हॉर्नरवर लावलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे होते. त्याने श्वानावर गोळी झाडलीच नव्हती. त्यामुळे हॉर्नरला निर्दोष ठरवण्यात आले. 

Web Title: dog saves man from serving 50 years jail term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.