इथे एकाजागी येतात देशातील आळशी लोक, भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:24 PM2018-08-21T12:24:01+5:302018-08-21T12:27:40+5:30

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे लोक एक दिवस थकू शकतात आणि पूर्ण दिवस बेडवर आळस करत पडून राहू शकतात. 

Colombians sleeps on street on world day of laziness | इथे एकाजागी येतात देशातील आळशी लोक, भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!

इथे एकाजागी येतात देशातील आळशी लोक, भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!

googlenewsNext

सध्याची लाइफस्टाइलची फारच धावपळीची झाली आहे. अनेकांना या लाइफस्टाइलमुळे डिप्रेशन, स्ट्रेसचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तर आराम करायलाही वेळ मिळत नाही. असे म्हणता येईल की, जीवनाच्या या धावपळीत थकना मना हैं...पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे लोक एक दिवस थकू शकतात आणि पूर्ण दिवस बेडवर आळस करत पडून राहू शकतात. 
हा देश आहे कोलंबिया. या देशातील लोक तणावाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकवर्षी 'आळस दिवस' दिवस साजरा करतात. 

कोलंबियाच्या इतागुई शहरात गेल्या रविवारी 'वर्ल्ड लेझिनेस डे' साजरा करण्यात आला. यासाठी लोक आपल्या घरातून उश्या, गादी, बेड घेऊन रस्त्यावर झोपताना दिसले. 

संपूर्ण दिवसभर आळस करण्याचा हा खास दिवस नवीन नाहीये. १९८५ पासून हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे गेल्या ३३ वर्षांपासून हा दिवस साजरा केला जातो. 

कोलंबियातील इतागुई शहराची लोकसंख्या २ लाख इतकी आहे. ३३ वर्षांपूर्वी एक नागरीक मारियो मोटोंयाने हा विचार आणला होता. त्याने म्हटले होते की, लोकांकडे एक आराम करण्याचा दिवस असावा.

या दिवशी आळशी लोकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात. म्हणजे कुणाचा पायजामा सर्वात चांगला आहे किंवा कोण सर्वात लवकर बेडवर पोहोचू शकतो, अशा या स्पर्धा असतात. 

Web Title: Colombians sleeps on street on world day of laziness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.