महिलेने बॉसला पाठवला असा मेसेज की एका झटक्यात गेली हातची नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 05:01 PM2019-06-20T17:01:04+5:302019-06-20T17:04:16+5:30

चीनमधील एका कंपनीने महिला कर्मचारीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियातील लोक हैराण झाले आहेत.

China woman get fired from her job for replying to message of boss | महिलेने बॉसला पाठवला असा मेसेज की एका झटक्यात गेली हातची नोकरी!

महिलेने बॉसला पाठवला असा मेसेज की एका झटक्यात गेली हातची नोकरी!

Next

(Image Credit : Joy 94.9) (प्रतिकात्मक फोटो)

चीनमधील एका कंपनीने महिला कर्मचारीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियातील लोक हैराण झाले आहेत. महिलेने तिच्या बॉसला जरा वेगळ्या अंदाजात मेलचा रिप्लाय केला. आणि त्यानंतर थेट महिलेले नोकरीहून काढून टाकण्यात आले.

चीनच्या हुनान चांग्शामध्ये एक बार आहे. या बारच्या मॅनेजरला बारमध्ये नोकरी करणाऱ्या मुलीने मेलमध्ये 'ओके' लिहून पाठवलं. पण त्यासोबतच एक इमोजीही पाठवला. त्यामुळे या तरूणीला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. यावर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.

कंपनीच्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना रोज एक मेसेज लिहायला असतो. पण या महिला कर्मचारीने ओकेसोबत  एक इमोजीही सेंड केला. कंपनीच्या नियमांचं पालन न केल्यामुळे तिला नोकरीहून काढून टाकलं.

महिलेने सांगितले की, बॉसने मला म्हणाले की, तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा मेसेज आला तर तुम्ही केवळ टेक्स्ट करायचं. कोणताही इमोजी पाठवायचा नाही. तुला कंपनीच्या नियमांबाबत माहिती आहे की, नाही. त्यानंतर महिलेला एचआरला भेटण्यास सांगण्यात आलं. तिने महिलेचा हिशेब करुन तिला कामाहून काढण्यात आल्याचं लेटर देण्यात आलं. महिलेने यावर सांगितले की, ती या कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होती. अशाप्रकारच्या स्थितीत पहिल्यांदाच अडकली गेली.

Web Title: China woman get fired from her job for replying to message of boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.