In Canada, temperatures -40 degrees, boiling water accumulate in ice | कॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर

ठळक मुद्देया थंडीतच जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कॅनडामध्येही थंडीने चांगलाच नीच्चांक गाठला आहे.हे तापमान उणे 40 पर्यंत गेल्याने कॅनडातील लोकांनी घरीच राहून नवीन वर्षाचं स्वागत केलं. तापमान कमी झाल्याने लोकांनी उकळतं पाणी हवेत फेकलं आणि त्याचा चक्क बर्फ तयार झाला.

कॅनडा : भारतासह जगभरात थंडीने चांगलाच जोर घेतला आहे. या थंडीतच जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कॅनडामध्येही थंडीने चांगलाच नीच्चांक गाठला आहे. हे तापमान उणे 40 पर्यंत गेल्याने कॅनडातील लोकांनी घरीच राहून नवीन वर्षाचं स्वागत केलं. पण घरी राहुनही काही नागरिकांनी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं. तापमान कमी झाल्याने लोकांनी उकळतं पाणी हवेत फेकलं आणि त्याचा चक्क बर्फ तयार झाला. पाहा व्हिडीयो -

via GIPHY

अन्टार्टिकाच्या एमंडसन स्कॉट वेदर स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार तिकडे सगळ्यात कमी तापमान आहे. पूर्वी एकदा 1993 साली अशी थंडी पडली होती. त्यानंतर 25 वर्षांनी अशी कडाक्याची थंडी पडली आहे. कॅनडाच्या मीटरोलॉजिस्ट एलेक्सजेंडर पेरेंट यांच्या म्हणण्यानुसार कॅनडामध्ये काही ठिकाणी वजा 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे लोकांनी घररनच सरत्या वर्षाला अलविदा केलं.  त्यांच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. 30 डिसेंबर रोजी तिकडे वजा 30 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. पाहा व्हिडीयो -

via GIPHY

या कमी तापमानात लोकांनी मजा करायची म्हणून गरम पाणी हवेत फेकलं आणि त्या पाण्याचं क्षणभरात बर्फात रुपांतर झालं. दि वेदर चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार अशा परिस्थितीमध्ये गरम पाण्याचं क्षणार्धात बर्फात रुपांतर होतं. या अतिथंड तापमानामुळे कॅनाडामध्ये नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आयोजित केलेले अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर प्राणी-पक्ष्यांनाही सुरक्षित आणि गरम ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. कॅनाडामध्ये गेल्या 25 वर्षातील हे सगळ्यात कमी तापमान असल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.