९ वर्षीय मुलीचं चमकलं नशीब, कोट्यवधी रुपयांची लागली लॉटरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:52 PM2019-04-18T12:52:15+5:302019-04-18T12:55:18+5:30

भारतीय असलेल्या ९ वर्षीय मुलीच्या नावाने खरेदी केली होती वडिलांनी लॉटरी.

9 Year old Indian origin girl win 7 crore lottery in Dubai | ९ वर्षीय मुलीचं चमकलं नशीब, कोट्यवधी रुपयांची लागली लॉटरी!

९ वर्षीय मुलीचं चमकलं नशीब, कोट्यवधी रुपयांची लागली लॉटरी!

Next

(Image Credit : 123RF.com)

मूळ भारतीय असलेल्या एका ९ वर्षीय एलिजा नावाच्या मुलीचं दुबईमध्ये चांगलंच नशीब चमकलं आहे. या मुलीला मंगळवारी चक्क ७ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. दुबईमध्ये Dubai Duty Free’s Millennium Millionaire नावाची एक लॉटरी सिस्टम आहे. ही लॉटरी गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. एलिजाच्या वडिलांनी तिच्या नावाने तिकीट खरेदी केली होती. 

एलिजाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्यासाठी ९ नंबर हा लकी नंबर आहे. त्यामुळे त्यांनी ०३३३ नंबरची लॉटरी खरेदी केली होती. कारण याची बेरीज ९ होते. जेव्हा मंगळवारी लकी ड्रॉ प्रक्रिया करण्यात आली तेव्हा ७ कोटींचं बक्षीस एलिजाच्या वाट्याला आलं. 

एलिजाचे वडील एम हे एलिजाला फार भाग्यशाली मानतात. त्यांचं म्हणणं आहे की, ६ वर्षांआधी जेव्हा एलिजा ३ वर्षांची होती तेव्हा त्यांनी याच लॉटरी सिस्टममध्ये एक लक्झरी कार जिंकली होती. एलिजाचे वडील हे मुंबईकर असून ते गेल्या १९ वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहेत. 

या लकी ड्रॉमध्ये एलिजासोबतच आणखीही दोन व्यक्तींना सरप्राइज गिफ्ट म्हणूण मोटारबाईक आणि कार देण्यात आली आहे. यात दुबईमध्ये २० वर्षांपासून राहणाऱ्या २३ वर्षीय भारतीय मोहम्मद हनीफ एडम आणि पाकिस्तानच्या मोहम्मद सफदर यांचा समावेश आहे. 

Web Title: 9 Year old Indian origin girl win 7 crore lottery in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.