कोई सरहद ना इन्हे रोके!; पशु-पक्षी करतात हजारो मैलांची सफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 08:16 PM2018-12-12T20:16:06+5:302018-12-12T20:16:54+5:30

अनेक प्राणी आणि पक्षी अन्न, पाणी आणि प्रजननासाठी स्थलांतर (Migration) करतात. हे स्थलांतर काही किमी अंतरापासून ते लाखो मील अंतरापर्यंत असते. ज्यामध्ये लाखो पशुपक्षी एकत्र प्रवास करत असतात.

5 epic incident of animal migration | कोई सरहद ना इन्हे रोके!; पशु-पक्षी करतात हजारो मैलांची सफर...

कोई सरहद ना इन्हे रोके!; पशु-पक्षी करतात हजारो मैलांची सफर...

googlenewsNext

अनेक प्राणी आणि पक्षी अन्न, पाणी आणि प्रजननासाठी स्थलांतर (Migration) करतात. हे स्थलांतर काही किमी अंतरापासून ते लाखो मील अंतरापर्यंत असते. ज्यामध्ये लाखो पशुपक्षी एकत्र प्रवास करत असतात. आज प्राणी आणि पक्षांमधील सर्वात लांबपर्यंतच्या पाच स्थलांतरांबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये लाखो प्राणी एकत्रच हजारो किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात. यामध्ये स्ट्रॉ कलर फ्रुट बॅट म्हणजेच वटवाघूळाची प्रजाती 80 लाख किमी, मोनार्क फुलपाखरू 3 कोटी किमी आणि आर्कटिक टर्न पक्षी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये 15 लाख किलोमीटरपर्यंत स्थलांतर करतात. म्हणजेच पृथ्वीपासून चंद्राचं जेवढं अंतर आहे त्याच्या सहापट अंतरावर हा पक्षी स्थलांतर करतो. 

1. आर्कटिक टर्न (Arctic Tern) : सरासरी 15 लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवास 

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये आर्कटिक टर्न पक्षांच्या स्थलांतराबाबत जाणून घेण्यासाठी एक छोटं डिवाइस विकसित करून ते एका पक्षाच्या पाठीवर लावण्यात आलं. त्यातून जी माहिती समोर आली त्याने संशोधकांनाही धक्का बसला. या डिव्हाइसमुळे असं समजलं की, हा छोटासा पक्षी प्रत्येक वर्षी 44 हजार किलोमीटरपर्यंत अंतरावर स्थलांतर करतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात हा पक्षी 15 लाख किलोमीटर स्थलांतर करतो. हे अंतर एवढे आहे की, आपण चंद्रावर 3 वेळा जाऊन आलो तरिही हे अंतर पूर्ण होणार नाही. हे पक्षी उत्तरी ध्रुवापासून आपल्या प्रवासाला सुरुवात करतात आणि दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. तसेच दक्षिण ध्रुवापासून पुन्हा आपल्या प्रजनन स्थान असलेल्या उत्तर ध्रुवापर्यंत येतात. 

2. अफ्रिकन विल्डबीस्ट (African Wildebeest) : दरवर्षी 20 लाख आफ्रिकी विल्डबीस्ट करतात 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास 

दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होणारं हे स्थलांतर स्तनपान करणाऱ्या जीवांमधील सर्वात मोठं स्थलांतर असतं. हा प्रवास तंजानिया आणि केन्यामध्ये सेरेंगेटीमध्ये होतं. यामध्ये 20 लाख आफ्रिकी विल्डबीस्ट तंजानियापासून 500 किलोमीटर दूरपर्यंत असलेल्या केन्यापर्यंत पोहोचते. परंतु यामधील काही विल्डबीस्टनदी पार करताना मगरी आणि वाघांची शिकार होतात.


 
3. लेदरबॅक समुद्री कासव (Leatherback Sea Turtles) : दहा हजार किलोमीटर अंतरावर करतात स्थलांतर 

तसं पाहायला गेलं तर सर्वच समुद्री कासवं प्रवास करतात. परंतु यामधील लेदरबॅक समुद्री कासव सर्वत लांब अतंरावर स्थलांतर करतात. हे कासव आपल्या प्रजननाच्या ठिकाणावरून आपल्या जेवणाच्या ठिकाणापर्यंतचा 10 हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात. हे कासव उत्तरेला नॉर्वेपासून ते दक्षिणेला न्यूझिलंडपर्यंतचा प्रवास करतात. यांची त्वचा मूळातच जाड असते यामुळे त्यांचं सर्दी आणि इतर ऋतूंपासून रक्षण होतं. लेदरबॅक कासवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजेच अंडी घालण्यासाठी प्रत्येक तीन वर्षातून त्याच समुद्र किनाऱ्यावर येतात. जिथे त्यांचा जन्म झाला होता. 

4. मोनार्क फुलपाखरू (Monarch Butterfly) : अनेक पिढ्यांपर्यंत करतात स्थलांतर 

मोनार्क फुलपाखरांचा प्रजननाचा काळ फार मोठा असतो. त्यांना मैक्सिकोपासून उत्तर अमेकिरेपर्यंत पोहोचण्यासाठी चार पिढ्या लागतात. जवळपास 3 कोटी फुलपाखरं दरवर्षी हे स्थलांतर करत असतात. 

5. स्ट्रॉ कलर फ्रूट वटवाघूळ (Straw-Colored Fruit Bat) : एकाच झाडावर झोपतात लाखो वटवाघूळं

स्ट्रॉ कलर फ्रूट प्रजातीचं 80 लाख वटवाघूळं एक विशेष फळ खाण्यासाठी कॉन्गोपासून जाम्बियाच्या सांका नॅशनल पार्कपर्यंत पोहोचतात.  विशेष म्हणजे 80 लाख वटवाघूळं 10000 एकर जमिनीवर पसरलेल्या जंगलामध्ये फक्त एकाच एकरमध्ये रहातात. याचा परिणाम असा  होतो की, झाडावर जवळपास 10 टन वजनाएवढी वटवाघूळं एकावर एक बसतात. 

Web Title: 5 epic incident of animal migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.