फक्त ८ व्या वर्षी केल्या थक्क करणाऱ्या गोष्टी, आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगलाही टाकलं मागे....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 01:05 PM2021-09-10T13:05:19+5:302021-09-10T13:20:58+5:30

एका चिमुकलीनं आयक्युच्या बाबतीत थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein) आणि स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांनाही मागे टाकलंय. तिची असमान्य प्रतिभा तुम्हाला थक्क करेल.

10 year old girl in Mexico iq is more than Stephan Hawking and Albert Einstein | फक्त ८ व्या वर्षी केल्या थक्क करणाऱ्या गोष्टी, आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगलाही टाकलं मागे....

फक्त ८ व्या वर्षी केल्या थक्क करणाऱ्या गोष्टी, आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगलाही टाकलं मागे....

Next

एका १० वर्षांच्या एका मुलीच्या आयक्यूसंदर्भातली ही बातमी थक्क करणारी आहे. ही मुलगी खूपच हुशार असून, तिनं आयक्युच्या बाबतीत थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein) आणि स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांनाही मागे टाकलंय. तिची असमान्य प्रतिभा तुम्हाला थक्क करेल. तिचं नाव अधरा पेरेझ सँचेझ (Adhara Pérez Sánchez) असं असून ती मेक्सिको या देशात राहते.

अधराला शाळेत मित्र-मैत्रिणी “weirdo” (विचित्र) म्हणून चिडवायचे. म्हणून तिनं शाळेत जाणंच सोडलं. मात्र, तिची आयक्यू टेस्ट केल्यावर लक्षात आलं, की तिची बुद्धिमत्ता अत्यंत उच्च पातळीची आहे. तज्ज्ञांनी घेतलेल्या यक्यु टेस्ट मध्ये (IQ Test) अधराने १६२ गुण मिळवले आहेत. आइन्स्टाइन आणि हॉकिंग या दोघांपेक्षाही तिला दोन गुण जास्त आहेत. हे दोन शास्त्रज्ञ जगातले सर्वांत बुद्धिमान असल्याचं मानलं जातं. त्यांच्या आयक्यु स्कोअरपेक्षा अधराचा स्कोअर जास्त आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

१० वर्षांची असलेल्या अधराची स्वप्नंही मोठी आहेत. तिला मोठं होऊन अंतराळवीर व्हायचं असून, मंगळ ग्रहावर (Mars) मानवी वस्ती वसवण्याचं स्वप्न तिने पाहिलं आहे. तीन वर्षांची असतानाच ती वाचायला शिकली. त्याच वयाची असताना ती अत्यंत कठीण कोडीही अगदी सहज सोडवायची. आठ वर्षांची असतानाच अधरा हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाली. बीजगणितात तिने विशेष नैपुण्य प्राप्त केलं असून, या छोट्या वयातच तिने सिस्टीम इंजिनीअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. तिने Monterrey च्या Universidad CNCI चं प्रतिनिधित्व केलं आहे. तिनं इतक्याश्या वयात स्वत:च्या अनुभवांवर 'डोन्ट गिव्ह अप' नावाचं पुस्तकंही लिहिलंय. नासाच्या स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचं तिचं स्वप्न आहे.

 

 

 

Web Title: 10 year old girl in Mexico iq is more than Stephan Hawking and Albert Einstein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.