Youth killed by dumping a dumpling rush | भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने तरुण ठार
भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने तरुण ठार

ठळक मुद्देडंपर चालक फरार डंपर चालक फरार

आॅनलाइन लोकमत
नशिराबाद, जि. जळगाव, दि. १७ - सुसाट वेगात ओव्हरटेक करणाऱ्या वाळूच्या डंपरने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकल चालक विजय (अमोल) अण्णा कोळी (रा.भोलाणे, ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना नशिराबाद महामार्गावर उड्डाणपुलाजवळ बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. डंपर चालक फरार आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती भुसावळकडून सुसाट वेगात येणारा रिकाम्या डंपरने (क्रमांक एमएच-१९, झेड-९९९७) ओव्हरटेक करण्याच्या नादात जळगावकडून भुसावळकडे जाणा-या मोटारसायकलला (एमएच-१९, डीसी-०५५५) समोरून जोरदार धडक दिली. त्यात विजय कोळी ४ी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. डंपर चालक फरार आहे. अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, गोकुळ तायडे, चेतन पाटील, किरण बाविस्कर, शांताराम तळेले, गुलाब माळी, ईदा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले असता विजय यास मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
विजयच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. पोलीस गुलाब माळी यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी
विजय कोळी याचा मृतदेह जिल्हा रुग्णलायात आणल्यानंतर या ठिकाणी नातेवाईक, मित्र तसेच भोलाणे गावातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.


Web Title: Youth killed by dumping a dumpling rush
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.