मुक्ताई सूतगिरणीतील चात्यांची क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:37 AM2018-09-30T01:37:14+5:302018-09-30T01:38:45+5:30

मुक्ताई सूतगिरणीची वार्षिक सभा : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती

 Will increase the capacity of Muktaiya Mattresses | मुक्ताई सूतगिरणीतील चात्यांची क्षमता वाढविणार

मुक्ताई सूतगिरणीतील चात्यांची क्षमता वाढविणार

Next
ठळक मुद्देआमदार एकनाथराव खडसे यांनी, गिरणीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शासनाकडून गिरणीस अद्याप अंदाजे ३.५० कोटी रुपये भाग भांडवल स्वरूपात मिळणे बाकी आहे हे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे, यातून चात्याची क्षमता १२,५०४ पर्यभविष्यात प्रकल्प क्षमता २५ हजार चात्यावर नेऊन प्रकल्पात जिनिंगची उभारणी करून भागधारक कापूस उत्पादकांचा कापूस खरेदी करून कापूस गठान गठाणपासून धागा निर्मिती ते कापड निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आह. यातून आपल्या परिसरात आणखी रोजगार उपलब्ध होईल.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीची २३ वार्षिक सर्वसाधारण सभा सूतगिरणी साइटवर चांगदेव शिवारात शनिवारी पार पडली. सद्य:स्थितीत असलेल्या चात्याची क्षमता वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी प्रस्ताविक करताना सूतगिरणीचे संचालक रमेश ढोले यांनी सांगितले की, कापूस उत्पादक असलेल्या आपल्या भागात सूतगिरणी असावी या हेतूने माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांनी २३ वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सूतगिरणीची स्थापना केली. गिरणीचे स्व.अध्यक्ष निखिल खडसे यांनी गिरणी उभारणीमध्ये मेहनत घेतली. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर सध्याच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी अथक मेहनत घेऊन प्रकल्प उभारणी पूर्णत्वास नेली. आज प्रकल्प ९५०४ चात्याच्या क्षमतेचा चालत आहे. याद्वारे ४०० जणांना रोजगार उपलब्ध झाला असून, यातील २०० कामगार महिला असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष संजय रघुनाथ चौधरी, संचालक दशरथ कांडेलकर, रमेश ढोले, राजू माळी, तुकडू घटे, लक्ष्मण भालेराव, भागवत पाटील, राजकुमार खंडेलवाल, देवराम सुपे तसेच बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, वैशालीबाई तायडे, वनिताबाई गवळे, भानुदास गुरचळ पं.स.सदस्य विकास पाटील, नगरसेवक पीयूष महाजन, विलास धायडे, शिवाजीराव पाटील, भागवत टिकारे, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे व सूतगिरणीचे भागधारक शेतकरी उपस्थित होते.
सरव्यवस्थापक जयंत उंबरकर यांनी लेखाजोखा मांडला. कार्यालय अधीक्षक डी.एम.जगताप यांनी आभार मानले.


 

Web Title:  Will increase the capacity of Muktaiya Mattresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.