बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

By admin | Published: May 25, 2017 11:11 AM2017-05-25T11:11:06+5:302017-05-25T11:11:06+5:30

भादली रेल्वे स्थानकावरील स्मारक हटणार : नवीन जागेत उभारणीचे नियोजन

When will the Balvi monument be neglected? | बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबणार कधी?

Next

ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी 

नशिराबाद, ता.जळगाव, दि.25- मराठी साहित्याला निसर्ग कवितांचे अमोल लेणं बहाल करणा:या आणि मराठी काव्यसृष्टीत अजरामर झालेल्या बालकवी कै.त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे भादली रेल्वे स्टेशनवर असलेले स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे लाईन विस्तारीकरण होत आहे. त्यात स्मारकाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तरी बालकवींच्या स्मारकाचे विस्तारीकरण होऊन कायापालट  व्हावे, स्मारकाचे सौंदर्य वाढावे, निसर्गरम्य बगिचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बालकवींच्या स्मृतिशताब्दी  वर्षाला 5 मे पासून सुरुवात झाली आहे. स्मृतिशताब्दी वर्षात तरी बालकवी स्मारकाची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
मराठी साहित्याला निसर्गकाव्याचा अमोल ठेवा देणा:या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. वयाच्या 12 व्यावर्षी त्यांनी ‘वनमुकुंद’ कविता लिहून आपली काव्यसाधना सुरू केली. बालवयातच त्यांनी विविध कविता लिहिल्या. 1907 ला जळगावच्या पहिल्या कवीसंमेलनात डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी त्यांना दिली. बालकवींनी 28 वर्षाच्या आयुष्यात सुमारे 163 कविता लिहिल्या. श्रावणमास, फुलराणी, निर्झरास, औदुंबर, संध्यारजनी आदी कविता लिहून त्यांनी मराठी काव्यरसिकांना मोहून टाकले.
निसर्गकवीचा 5 मे 1918 रोजी नशिराबादजवळ असलेल्या भादली रेल्वे स्टेशन येथे अपघाती मृत्यू झाला. बालकवी ठोंबरे यांच्या जन्मशताब्दी दरम्यान 1990 मध्ये भादली रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार झाला. 
बालकवी ठोंबरेंचे अपघाती निधन याच रेल्वे स्थानकावर झाले. त्यामुळे त्यांचे येथे स्मारक असावे, असा विचार जिल्ह्यातील साहित्यिक व ग्रामस्थांनी मांडला. तत्कालीन रेल्वे स्थानक मास्तर एम.जी.चौबे व सुधाकर पाटील यांनी रेल्वे विभागाची परवानगी घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने तिकीट कार्यालयाजवळ चबुतरा उभारला. या चबुतरावर ‘निर्झरास’ ही बालकवींची कविता कोरण्यात आली. चबुतरावर पुस्तक, दौत, टाक असे स्मारकाचे स्वरुप आहे. त्यावर शेड उभारुन बालकवींचे स्मारक आजही त्याच रुपात उभे आहे. त्यात कुठलाही बदल नाही.

Web Title: When will the Balvi monument be neglected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.