जळगावात आज होणार सुरळीत पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:14 PM2018-06-04T14:14:20+5:302018-06-04T14:14:20+5:30

शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघूर रॉ वॉटर, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र व गिरणा टाकी या तीनही ठिकाणचे विद्युतरोधक फुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी शहरात वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे.

Water supply to Jalgaon today | जळगावात आज होणार सुरळीत पाणी पुरवठा

जळगावात आज होणार सुरळीत पाणी पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देविद्युतरोधक फुटल्याने वीज पुरवठा झाला होता खंडितपाण्याच्या टाक्या भरल्यावीजपुरवठा सुरु झाल्यानंतर वाघूर धरणावरील चारही पंप सुरु

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.४ : शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघूर रॉ वॉटर, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र व गिरणा टाकी या तीनही ठिकाणचे विद्युतरोधक फुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी शहरात वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे.
मनपा व महावितरणच्या अधिकाºयांनी रात्री पाहणी केली असता कुसुंबा गावाजवळील एका ढाब्यानजीक विजेच्या खांबावरील विद्युतरोधक फुटल्याचे दिसून आले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाºयांनी खांबावरील फुटलेले विद्युतरोधक बदलवून वीजपुरवठा सुरु केला. रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नियोजीत पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता.
रविवारी सकाळी वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर वाघूर धरणावरील चारही पंप सुरु करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. दरम्यान, सिंधी कॉलनी, गणेशनगर भागात रविवारी पाणी पुरवठा झाला.
आज या भागात होईल पाणीपुरवठा
शहरातील नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुने गाव, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या परिसरात पाणीपुरवठा होईल, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

Web Title: Water supply to Jalgaon today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.