जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:58 AM2019-05-15T11:58:59+5:302019-05-15T11:59:26+5:30

खरीप दुष्काळ अनुदानाचे ९९.६१ टक्के वाटप पूर्ण

Water problem problem in Jalgaon district is serious | जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

Next

जळगाव : जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके पूर्णपणे दुष्काळी तसेच उर्वरीत दोन तालुक्यांनाही पैसेवारी कमी आल्याने दुष्काळाचे निकष लागू झालेले असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील खरीपाचे नुकसान झालेल्या ५ लाख ८२ हजार १४६ शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपयांचे म्हणजेच ९९.६१ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून १९३ गावांना सध्या १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार मीना हे बुधवार, १५ रोजी जिल्हा दौºयावर येत असून ते सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दालनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्केच पाऊस झाल्याने यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ पडला असून आहे. त्यापैकी जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, पारोळा, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर एरंडोल व धरणगाव हे तालुके मात्र केंद्र शासनाच्या निकषात न बसल्याने वगळण्यात आले. मात्र या दोन तालुक्यांमध्ये देखील पीक पैसेवारी ५० टक्क्यांच्या आतच आली आहे. मात्र खरीप दुष्काळ अनुदान मात्र १३ तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनाच वाटप करण्यात आले आहे.
५ लाख ८२ हजार शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटप
जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील १३४६ गावांमधील ५ लाख ८२ हजार १४६ शेतकºयांना खरीप दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून ४०४ कोटी ६१ लाख ४१ हजार २८० रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपये इतका निधी दुष्काळ अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. तर प्रशासकीय खर्चाचे ५९ लाख ९४ हजार ८०० रूपये वगळण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ६२ लाख ८७हजारांचा निधी आवश्यकता नसल्याने शासनाला परत करण्यात आला आहे. १३ पैकी भुसावळ व बोदवड तालुका वगळता उर्वरीत ११ तालुक्यांमध्ये १०० टक्के अनुदानाचे वाटप झाले असून भुसावळमध्ये ९५.१३ टक्के तर बोदवड तालुक्यात ९४.०१ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे.
बोंडअळी अनुदान वितरणाची आकडेवारीच नाही
मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील शेतकºयांना वाटपासाठी ४३९ कोटी ४० लाख ८० हजारांचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. मात्र तालुकास्तरावरून किती शेतकºयांना त्याचे वितरण झाले? याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. तहसीलदारांकडून ही माहिती मागवूनही तातडीने सादर करण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.
२७१ गावांसाठी २७८ विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. जोरदार पाऊस न झाल्याने धरण, बंधाºयांमध्ये ठणठणाट आहे. मोजक्या धरणांमध्येच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे १९३ गावांना १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. तर २७१ गावांसाठी २७८ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ५४ गावांसाठी ५१ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तर ६१ गवांसाठी १११ नवीन विंधन विहिरी तर ४२ गावांना ५८ नवीन कपूनलिका घेण्यात आल्या आहेत. ४८ गावांमध्ये ४८ विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे. तर २ गावांना २ नळपाणी योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

Web Title: Water problem problem in Jalgaon district is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव