पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

By ram.jadhav | Published: November 24, 2017 12:17 AM2017-11-24T00:17:46+5:302017-11-24T00:25:55+5:30

 Water coming will stop. It can be really ..! | पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

Next
ठळक मुद्देपाण्याचा योग्य वापर करणे हे शिकावे लागणार आहे़शेतकºयांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांना पाणी कसे द्यावे हे शिकावेपाणी व्यवस्थापन हा शालेय जिवनापासूनच सक्तीचा विषय असावा़

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/बी़डी़ जडे, जळगाव
आॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव साजरा करतानासुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो की बकरी-ईद, कुणीही याला अपवाद असता कामा नये़ शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे़ ती वाचवायलाच हवी. साठवलेल्या पाण्याचा कोटेकोरपणे वापर व्हायला हवा़ पाण्याचा पुर्नवापरही अवश्य व्हायला हवा़ शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीला पाणी न देता, पिकांना पाणी देण्याचे तंत्र शिकणे काळाजी गरज आहे़
पाच ते सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह केला, आणि महम्मद गजनीने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बस झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात वॉटर मॅनेजमेंट हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा़ तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं सक्तीच शिक्षण असायला हवं. आज इस्त्राईलसारख्या देशात आपल्या तुलनेने केवळ १० टक्के पाऊस पडतो, तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. याचं कारण म्हणजे त्यांचा ‘पाणी व्यवस्थापन’ हा अभ्यास इतका पक्का आहे, की एकदा नळातून पडलेल्या पाण्याचा जवळपास सात वेळा पुनर्वापर होऊनच ते शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अंमलात का आणू शकत नाही?
आपण स्वत:ला 'शेतीप्रधान' देश म्हणवतो़ आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही, पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? पाऊस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट' होईल ही परिस्थिती येतेच कशी? स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप लाईन या गळक्या किंवा फुटक्याच़ एक पाईप लाइन फुटली तर लाखो लीटर पाणी गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही, एकाचाही जीव जळत नाही़
जपानमध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे नाही़ ते अमलात आणणे गरजेचे आहे़ इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसºया दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का? आज आपल्याला बटन दाबलं की वीज मिळते आणि नळ सोडला की पाणी पडतं याचे अनेक ठिकाणी बºयाच वेळा वाईट आकलन होताना दिसतं़
गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम व गाण्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘वर्षभर पाणी कसं वाचवता येईल’ यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा़ आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय़ उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी नवीन मोहीम हाती घ्यावी लागेल़

Web Title:  Water coming will stop. It can be really ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.