जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्याला सलग दुस-या दिवशी कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:32 PM2018-03-27T22:32:47+5:302018-03-27T22:32:47+5:30

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला पुन्हा मंगळवारीही न्यायालयाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पंकज याला सलग दोन दिवस दोन गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Two-day imprisonment for two-wheeler robbery in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्याला सलग दुस-या दिवशी कारावासाची शिक्षा

जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्याला सलग दुस-या दिवशी कारावासाची शिक्षा

Next
ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल सोमवारीही सुनावली होती शिक्षाचोरीचा आरोप सिध्द

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२७ : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला पुन्हा मंगळवारीही न्यायालयाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पंकज याला सलग दोन दिवस दोन गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात एका हॉटेलवर व्यवस्थापक असलेल्या प्रकाशचंद्र विभूतीभूषण रॉय (वय ४५ रा.के.सी.पार्क, जळगाव) हे ६ आॅगस्ट २०१६ रोजी ड्युटीला आले असता स्टेशन परिसरात दुचाकी (क्र.एम.एच.१९ एक्स ६८३३) पार्कींग केली होती. दुसºया दिवशी ड्युटी संपल्यावर घरी जायला निघाले असता दुचाकी गायब झालेली होती. दोन दिवस शोध घेतल्यानंतरही उपयोग न झाल्याने १० आॅगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पंकज यानेही दुचाकी आव्हाणे शिवारातील कचरा प्रकल्पाजवळ लपविलेली होती. न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात फिर्यादी प्रकाशचंद्र रॉय, तपासाधिकारी वासुदेव सोनवणे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. ४ महिने सश्रम कारावास, ४०० रुपये दंड व दंड न भरल्यास ४ दिवस साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.  

Web Title: Two-day imprisonment for two-wheeler robbery in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.