शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 05:27 PM2017-09-06T17:27:46+5:302017-09-06T17:34:24+5:30

गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत. 

Two college youths drowned while immersing Ganesh in Shandurani | शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू

शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देश्यामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी गेले होेते युवक घरगुती स्वरुपातील गणपतीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या बांधावरून युवकांचा घसरला पायदोन्ही युवक घेत होते अकरावी कला शाखेत शिक्षण

आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी, ता. जामनेर, दि.६ - गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत. 
येथील श्यामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी काही युवक गेले होेते. घरगुती स्वरुपातील गणपतीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या बांधावरून या युवकांचा पाय घसरला. त्यात जीवन धनगर व योगेश धनगर हे धरणाच्या विहिरीत पडले. यांना वाचविण्यासाठी इतर युवकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या दोघांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही युवक इयत्ता अकरावी कला शाखेत शिक्षण घेत होते.

Web Title: Two college youths drowned while immersing Ganesh in Shandurani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.