लग्न आटोपून घरी परतणाऱ्यांच्या कारला भरधाव ट्रकने दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:06 PM2018-12-02T22:06:10+5:302018-12-02T22:08:32+5:30

अमळनेर येथे मित्राच्या मुलाचे लग्न आटोपून घरी परतणाºया कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.

The truck was hit by a truck carrying a car after getting married | लग्न आटोपून घरी परतणाऱ्यांच्या कारला भरधाव ट्रकने दिली धडक

लग्न आटोपून घरी परतणाऱ्यांच्या कारला भरधाव ट्रकने दिली धडक

googlenewsNext
ठळक मुद्देबिलवाडी फाट्यावर अपघातनेरी येथील चार जण जखमीट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव : अमळनेर येथे मित्राच्या मुलाचे लग्न आटोपून घरी परतणाºया कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यात कारमधील चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता बिलवाडी, ता.जळगाव फाट्याजवळ घडली. सर्व जखमी नेरी, ता.जामनेर येथील असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नेरी येथील दिनेश रामधन पाटील, चंद्रकांत शिवाजी कळसकर, आमीन गुलाब पिंजारी, संतोष कुमार नानुराम जैन असे चौघे जण जैन यांच्या कारने (क्र.एम.एच १९, बी.व्ही.४४१९) अमळनेर येथे शनिवारी मित्रांच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ९ वाजता ते नेरी येथे परत येण्यासाठी अमळनेर येथून निघाले. रात्री ११ वाजता बिलवाडी फाट्याजवळ वावडदाकडून म्हसावदकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.०४, ई.एल.३४२९) ने कारला धडक दिली. चालक दिनेश पाटील यांनी नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक भरधाव होता.
या अपघातात चालक दिनेश पाटील यांच्या डोक्याला मार लागला आहे तर, सोबत असलेले आमीन पिंजारी यांच्या तोंडावर, चंद्रकांत कळसकर यांना डोक्याला व संतोष जैन यांना पाठीला व छातीस मार लागून दुखापत झाली. तसेच कारच्या दरवाजाचे तसेच समोरील बाजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माहिती मिळताच दिनेश पाटील यांचे मोठे भाऊ डॉ.जगदीश पाटील यांनी १०८ या रुग्णवाहिकेने चौघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. याबाबत दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे.

Web Title: The truck was hit by a truck carrying a car after getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.