जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 03:48 PM2019-02-03T15:48:48+5:302019-02-03T15:50:19+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा.शाहू नगर,जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (वय २९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (वय २७, रा.सावखेडा, ता.जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

The tractor retreated from the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा ट्रॅक्टर

जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा ट्रॅक्टर

Next
ठळक मुद्देतिघांना अटक  सतत ट्रॅक्टर व डंपर पळविण्यामागे गौडबंगाल काय? सलग तिसरी घटना

 जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा.शाहू नगर,जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (वय २९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (वय २७, रा.सावखेडा, ता.जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
म्हसावद मंडळाधिकाºयांच्या पथकाने एक ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले होते. या ट्रॅक्टर मालकाला नोटीसही बजावण्यात आलेली होती, असे असताना शनिवारी रात्री साडे दहा वाजता दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून ट्रॅक्टर पळवून नेले. हे ट्रॅक्टर व दोन दुचाकी (क्र.एम.एच.१९ टी.५१६५ व एम.एच.१९ सी.डी.१०५१) तलाठी रमेश वंजारी यांना पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे आढळून आले. तेथे मोहसीन, शाहीद व महेंद्र असे तिघं आढळून आले. त्यांना ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. याप्रकरणी रात्री तिघांविरुध्द ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तपासी अमलदार महेंद्र बागुल व सहका-यांनी अटक केली.
का घडताहेत वाहने पळविण्याचे प्रकार
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून सात ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर दुसºयाच दिवशी आणखी एक डंपर पळविण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी एक ट्रॅक्टर पळविण्यात आले. गुरुवारपासून सलग तीन दिवस वाहने पळविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातून तेही  सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक असताना वाळूचे वाहने पळविले जात असतील तर इतर ठिकाणी वाहने कसे सुरक्षित राहतील. काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली. वारंवार याच दोन्ही कार्यालयातून वाहने पळविले जात असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची ओरड होत आहे.

Web Title: The tractor retreated from the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.