पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:01 PM2021-06-22T23:01:05+5:302021-06-22T23:01:58+5:30

पाचोरा आणि अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनात चार जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे.

Three strangled in different incidents in Pachora taluka | पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास

पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देमृतांमध्ये शिंदाडमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : तालुक्यात वेगवेगळ्या घटनात तीन जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. तारखेडा खु. येथील सूरज राजेंद्र कोळपकर या २८ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तर, खडकदेवळा खु. येथे प्रकाश भिकन सुरडकर (५५) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमळनेरात तरुणाचा गळफास

अमळनेर : शहरातील पिंपळे रोडवरील जेडीसीसी बँक कॉलनीतील रहिवासी संदीप अंकुश भिल (२५) या तरुणाने डॉ. बहुगुणे यांच्या गट नंबर १५७५/३ मधील प्लॉटिंग भागात बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिंदाड येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

शिंदाड, ता. पाचोरा : येथील श्रेयस आबा पाटील (१६) या विद्यार्थ्याने दि २१ रोजी संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. किराणा व्यावसायिक आबा लटकन पाटील यांचा एकुलता एक मुलगा हा दि. २१ रोजी पाचोरा येथे किराणा माल घेण्यासाठी गेला होता. संध्याकाळी ६ वाजता पाचोरा येथून घरी आला. वडिलांनी दुकानात बसण्यासाठी बोलावले असता वेळ झाला तरी दुकानात आला नाही म्हणून आई ,वडील पाहण्यासाठी आले. मित्रांना फोन केला. मात्र श्रेयस दिसून आला नाही. शेजारील त्यांचे रिकामे घर बघितले असता श्रेयस दोरीला लटकलेला आढळून आला. खाजगी डॉक्टरांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले. श्रेयस हा समाज विकास विद्यालय चा इ १० वी चा विद्यार्थी होता. तो हुशार होता व मित्रांमध्येदेखील सर्वांचा आवडता होता. पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three strangled in different incidents in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.