जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:19 PM2018-10-29T18:19:04+5:302018-10-29T18:21:18+5:30

गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे.

Supreme colony of Jalgaon and adjoining area | जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ दिवसांपासून नळांना पाणीच नाहीमनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनमनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष कायम

जळगाव : गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे. मनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेविका जिजाबाई भापसे यांनी दिला आहे.
शहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र सुप्रीम कॉलनी व परिसरात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होतो मात्र गेल्या ११ दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा झालेला नाही. रविवारी १२ वा दिवस होता. आज पाणी पुरवठा करण्यात येईल अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र झाला नाही. मनपाच्या अधिकाºयांकडे याबाबत तक्रार करुनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज नगरसेविका जिजाबाई भापसे यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांना जाब विचारला. त्यांनी मनपात याबाबत तक्रार केली मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले असल्याची माहिती नगरसेविकापूत्र सुरेश भापसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सुप्रीम कॉलनी परिसरात नितीन साहित्यानगर, खुबचंद साहित्या नगर, इंद्रप्रस्थ पोलीस कॉलनी, अमीत कॉलनी, ताजनगर, उस्मानियानगर अशा अनेक कॉलन्यांमध्ये सुमारे २५ हजार रहिवासी वास्तव्य करतात. तळ हातावर पोट असलेल्या रहिवाशांना १२ दिवसांपासून पाणी न मिळाल्याने प्रचंड हाल होत आहे. सोमवारी पाणी पुरवठा न झाल्यास मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Supreme colony of Jalgaon and adjoining area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.