Suicide of the young farmer in Jalgaon | तरुण शेतकऱ्याची जळगाव येथे आत्महत्या 
तरुण शेतकऱ्याची जळगाव येथे आत्महत्या 

जळगाव : डोक्यावरील कर्जाचा डोंगर व शेतातील उत्पन्नात घट यामुळे हताश झालेल्या राजेश शांताराम गायकवाड (३२) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता सावखेडा, ता. जळगाव येथे घडली.

गुरुवारी राजेश यांची पत्नी कोकीळाबाई ही गावात आईकडे गेलेली होती. तर मुले शाळेत गेलेली होती. घरात एकटे असल्याची संधी साधत राजेश याने घरातील पंख्याला गळफास घेतला. पत्नी घरी परतल्यावर दरवाजा आतून लावलेला आढळला. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी रहिवासी तसेच राजेश यांचे लहान भाऊ संजय गायकवाड यांना प्रकार कळविला. त्यांनी ग्रामस्थांसह दरवाजा तोडला असता घरात राजेश यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.


Web Title: Suicide of the young farmer in Jalgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.