गाडेगाव घाटात वाहनाने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:45 PM2018-12-02T21:45:50+5:302018-12-02T21:47:36+5:30

जळगाव-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या गाडेगाव घाटात एका वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.

Sudden stomach was taken by vehicle in Gadegaon Ghat | गाडेगाव घाटात वाहनाने घेतला अचानक पेट

गाडेगाव घाटात वाहनाने घेतला अचानक पेट

Next
ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील घटनावाहनातील तिघे प्रसंगावधान राखत पडले बाहेररस्त्यावरील नागरिकांनी केली मदत

नेरी,ता.जामनेर : जळगाव-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या गाडेगाव घाटात एका वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रात्री ८ वाजताच्या सुमारास नेरी कडून जळगावकडे जात असतांना चारचाकी क्र जी.जे.१५, डी डी८२९८ ही गाडी अचानक पेटली. सुदैवाने मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीचे मालक सचिन व्यास (रा.धानोरा ता.चोपडा) हे आपल्या वाहनाने पत्नी व मुलासह औरंगाबाद येथे दवाखान्यात गेले होते. तेथून जळगावकडे परत येत असतांना रात्री ८ वाजताच्या सुमारास धावत्या गाडीने अचानक पेट घेतला.गाडी पेट घेत असल्याचा अंदाज येताच तिघे जण गाडी थांबवून खाली उतरले.

Web Title: Sudden stomach was taken by vehicle in Gadegaon Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.