‘ते’ विद्यार्थी असणार अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षासाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:44 PM2019-07-18T17:44:05+5:302019-07-18T17:44:48+5:30

विद्यापीठाचा निर्णय : सीजीपीए पॅटर्ननुसार प्रवेशित विद्यार्थ्यांनासाठी सवलत

The student will be eligible for the fourth year of Engineering | ‘ते’ विद्यार्थी असणार अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षासाठी पात्र

‘ते’ विद्यार्थी असणार अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षासाठी पात्र

googlenewsNext

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमास सीजीपीए पॅटर्न (२०१२-१३) नुसार प्रवेशीत ज्या विद्यार्थ्यांच द्वितीय व तृतीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत असे विद्यार्थी सन २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षासाठी प्रवेशास पात्र राहतील असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील काही अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाशी सन २०१७-१८ पासून संलग्नित झाले आहेत. गतवर्षी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांची (तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसह) सीजीपीए २०१२-१३ या अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची शेवटची बॅच होती़ त्यामुळे विद्यापीठाने या पॅटर्ननुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत. असे विद्यार्थी तृतीय वर्षाच्या वर्गास सन २०१८-१९ या वर्षी प्रवेशासाठी पात्र राहतील असा निर्णय घेण्यात आला होता़
बुधवारी झाली परीक्षा व मुल्यमापन मंडळाची बैठक
यंदा शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांची चतुर्थ वर्षाच्या वर्गाची शेवटची बॅच असणार आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बुधवारी बैठकीत चर्चा झाली आणि त्यामध्ये सीजीपीए पॅटर्न २०१२-१३ नुसार ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत असे विद्यार्थी सन २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षासाठी प्रवेशास पात्र राहतील असा निर्णय घेण्यात आला. ही सवलत सीजीपीए पॅटर्न २०१२-१३ नुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षाच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे़ सन २०१७ आणि २०१८ पॅटर्ननुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांना एटीकेटीचे नियम अभ्यासक्रमात उल्लेख केल्या प्रमाणे लागू राहतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.
 

Web Title: The student will be eligible for the fourth year of Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.