मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:30 PM2019-05-04T17:30:12+5:302019-05-04T17:31:38+5:30

मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत.

Special weekly trains for Mumbai-Nagpur and Nagpur-Mumbai | मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या

मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईसाठी विशेष साप्ताहिक गाड्या

Next
ठळक मुद्देगाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूरगाडी क्रमांक ०१०७४ नागपूर-मुंबई

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत.
गाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूर ही गाडी दर रविवारी मुंबईवरून ५ मे ते ३० जून दरम्यान सकाळी ११:३० ला मुंबईवरून सुटेल.
०१०७४ नागपूर-मुंबई ही गाडी ६ मे ते १ जुलै दरम्यान दर सोमवारी सकाळी ६:५० वाजता नागपूरवरून सुटेल.
गाडी क्रमांक ०१०७५ मुंबई-नागपूर दर मंगळवारी ७ मे ते २ जुलै दरम्यान रात्री साडेबारा वाजता मुंबईवरून सुटेल तर गाडी क्रमांक ०१०७६ ही गाडी नागपूरवरून ७ मे ते २ जुलै दरम्यान दुपारी चार वाजता मुंबईसाठी सुटेल.
या विशेष गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Special weekly trains for Mumbai-Nagpur and Nagpur-Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.