Silent mob by Shimpi Samaj in Pancharatya | पाचोऱ्यात शिंपी समाजातर्फे मूकमोर्चा
पाचोऱ्यात शिंपी समाजातर्फे मूकमोर्चा

ठळक मुद्देउंडणगाव येथील पीडितेस आत्महत्येस केले प्रवृत्तआरोपीस कठोर शिक्षा करावीखटला जलदगती न्यायालयात चालवावा

पाचोरा, जि.जळगाव : महाविद्यालयातील लिपिकाने शिंपी समाजातील अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ केल्याने पीडित मुलीने या प्रकाराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून पाचोरा येथील क्षेत्रीय अहिर शिंपी समाजातर्फे मंगळवारी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.
सूत्रांनुसार, उंडणगाव, ता.सिल्लोड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शिंपी समाजातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील लिपिक संजय घुगरे रा.घतांबी, ता.सिल्लोड याने छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे पीडित मुलीला जीव गमवावा लागला. या घटनेतील आरोपीस अजिंठा पोलीस ठाण्यात अटक करून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहर तालुका क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे युवक-युवती, महिला समाज बांधवांनी एकत्र येऊन येथील हुतात्मा स्मारकात शोकसभा घेतली. यातील नराधमास कठोर शिक्षा व्हावी, घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करावी. पीडित कन्येच्या कुटुंबाला समाजाचा पूर्ण पाठिंबा देण्यात येऊन प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे या आशयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी हुतात्मा स्मारक येथून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.
तहसीलदारांच्यावतीने अव्वल कारकून व्ही.बी.कुमावत यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी क्षेत्रीय अहिर शिंपी समाज महिला मंडळ, युवा मंडळ, तालुका शिंपी समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Web Title: Silent mob by Shimpi Samaj in Pancharatya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.