जळगावात महिलेची मंगलपोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:13 PM2018-06-16T21:13:00+5:302018-06-16T21:13:00+5:30

घरानजीक असलेल्या बुथवर दूध घेण्यासाठी जात असताना वंदना बापू नेरकर (वय-३५, रा़ इंदू हाईटस्समोर, त्र्यंबकनगर) या महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी धूम स्टाईलने लंपास केली़

Settle the woman in Jalgaon | जळगावात महिलेची मंगलपोत लांबविली

जळगावात महिलेची मंगलपोत लांबविली

Next
ठळक मुद्देदुचाकीवरुन आले चोरटेत्र्यंबक नगरातील सकाळी ७.३० वाजेची घटनामहिलेला ढकलून देत ठोकली धूम

जळगाव- घरानजीक असलेल्या बुथवर दूध घेण्यासाठी जात असताना वंदना बापू नेरकर (वय-३५, रा़ इंदू हाईटस्समोर, त्र्यंबकनगर) या महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी धूम स्टाईलने लंपास केली़ शनिवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास ही घटना त्र्यंबकनगरातील इंदू हाईट्स समोर घडली़
मंगलपोत हिसकावून ढकलून देत ठोकली धूम
शनिवारी वंदना या नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता घराजवळ असलेल्या दुधाच्या बुथावर दूध घेण्यासाठी घरातून निघाल्या़ त्या इंदू हाईट्ससमोरून जात असताना त्यांच्या समोरून दुचाकीवरून दोन तरूण आले़ त्यापैकी मागे बसलेल्या पिवळा टिशर्ट घातलेल्या तरूणाने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत हिसकावून त्यांना ढकलून देत धूम ठोकली़

Web Title: Settle the woman in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.