जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:58 PM2019-02-04T18:58:49+5:302019-02-04T19:00:47+5:30

जामनेर तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला.

Senior Citizen Service Team Front at Jamner | जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

Next
ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी तहसीलवर दिली धडकज्येष्ठ नागरिकांंचे वय ६५ ऐवजी ६० असावेशेतकरी-शेतमजूर ६० वर्षांवरील सर्वांना दरमहा शासनाने निवृती वेतन द्याव

जामनेर : तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला.
ज्येष्ठ नागरिक संघापासून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून एल्गार पुकारला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिनकर पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांंचे वय ६५ ऐवजी ६० असावे, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी नियोजित धोरणाकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येत्या आर्थिक बजेटमध्ये असावी, विनामूल्य आरोग्य विमा योजना चालू करावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्ती वेतनात वाढ करावी, स्वतंत्र विभाग आयुक्तालय स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करावी, शेतकरी-शेतमजूर ६० वर्षांवरील सर्वांना दरमहा शासनाने निवृती वेतन द्यावे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रतिनिधी मंडळास मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी चर्चेसाठी वेळ देवून बोलवावे, महात्मा फुले जीवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात यावा.
यावेळी अध्यक्ष नारायण देशमुख, डॉ.रामदास पाटील, रंगनाथ पाटील, रसानसिंग पवार, पांडुरंग देशमुख, विश्वनाथ महाजन, पाडुरंग माळी, हुकूमचंद मंडलेजा, चंद्रकांत डोळे, अनंतराव पाटील, देवीदास पाटील, सुधाकर पालवे, जगन्नाथ चिंचकर, विठ्ठल देशमुख, अवधूत सोनवणे, नारायण वाघ, बाबूराव सैतवाल, अभिमान सोनवणे, मन्साराम माळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Senior Citizen Service Team Front at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.