दप्तर तपासणी अहवालात आव्हाणे सरपंच व ग्रामसेवक दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:29 PM2018-02-07T22:29:53+5:302018-02-07T22:30:10+5:30

तालुक्यातील आव्हाणे ग्राम पंचायतीच्या खर्च निधीत अनियमितता आढळून आल्याने सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड यांच्या प्राथमिक तपासणीत सरपंच वत्सला रामा मोरे व ग्रामसेवक व्ही.एम.रंधे हे दोषी आढळले असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली.

Sarpanch and Gramsevak guilty | दप्तर तपासणी अहवालात आव्हाणे सरपंच व ग्रामसेवक दोषी

दप्तर तपासणी अहवालात आव्हाणे सरपंच व ग्रामसेवक दोषी

Next
ठळक मुद्दे१४ व्या वित्त आयोगाच्याखर्चात अनियमितता युवकांनी केली होती तक्रारसीईओंकडे होणार सादर

आॅनलाईन लोकमत

जळगाव-तालुक्यातील आव्हाणे ग्राम पंचायतीच्या खर्च निधीत अनियमितता आढळून आल्याने सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड यांच्या प्राथमिक तपासणीत सरपंच वत्सला रामा मोरे व ग्रामसेवक व्ही.एम.रंधे हे दोषी आढळले असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिक-यांनी दिली.

आव्हाणे येथील युवकांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे गावात १४ वित्त आयोगाच्या निधीतून खर्च झाला नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार सीईओंनी आव्हाणे येथे प्रत्यक्ष भेट देवून ग्राम पंचायतीचे दप्तर जमा करुन, सहाय्यक गटविकास अधिकारी  गायकवाड यांच्याकडे तपासणीचे आदेश दिले होते. गायवाड यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत ग्राम पंचायतीने १४ व्या वित्त आयोगातंर्गत खर्चामध्ये अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये ७ लाख रकमेच्या खर्चाची व कामांची अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका, मुल्यांकन दप्तरी घेतले नसल्याचे आढळून आले आहे. २ लाख ९५ हजार रुपयांच्या सीसीटीव्ही कॅमेरे निविदा प्रक्रिया न राबविताच खरेदी केले व एलईडी ९८ हजार या खरेदी भाव पत्रके न घेता खरेदी केले असल्याचे आढळून आले आहे. तसेच २०१७-१८ मधील १५ लाख ८ हजार व २०१६-१७ मधील ५० हजार रुपये अशा एकूण १५ लाख ५८ हजार रुपयांच्या खर्चास सरपंच वत्सला मोरे व ग्रामसेवक व्ही.एम.रंधे हे जबाबदार असल्याचे या अहवलात म्हटले आहे.

सीईओंकडे होणार सादर
१४ व्या वित्त आयोगासोबतच  महिला ग्रामसभाा न होणे, मासिक सभांचे अपूण इतिवृत्त, अपंग, महिला बालकल्याण व मागासवर्गिय या घटकांवर निधी खर्च न करण्याप्रकरणी देखील सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळले. दरम्यान, हा अहवाल आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर होणार असून,  त्यावर  सीईओ पुढील कारवाई करणार असल्याची माहिती जि.प.च्या सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Sarpanch and Gramsevak guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.