कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडेंवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:39 PM2019-03-30T12:39:33+5:302019-03-30T12:39:48+5:30

पाच हजार रूपये व हातातील सोन्याची अंगठी अज्ञातांनी लांबवली.

Sanjay Vardan's former Taluka chief | कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडेंवर हल्ला

कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडेंवर हल्ला

Next


जळगाव : माजी खासदार डॉ़ उल्हास पाटील यांची भेट घेतल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या काँगे्रस पक्षाचे माजी जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष संजय भाऊलाल वराडे (रा़ अयोध्यानगर) यांच्या वाहनावर अज्ञात सहा हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८़४० वाजता भास्कर मार्केट परिसरातील मालती हॉस्पीटलसमोर घडली़ हल्लेखोरांनी हॉकी स्टीकने कारच्या काचा फोडल्यानंतर वराडे यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पाच हजार रूपये व हातातील सोन्याची अंगठी अज्ञातांनी लांबवली.
मुळेचे चिंचोली येथील रहिवासी काँग्रेस पक्षाचे माजी जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष संजय वराडे हे सध्या शहरातील अयोध्यानगरात कुटूंबासह वास्तव्यास आहेत़ शुक्रवारी सायंकाळी ते भास्कर मार्केट परिसरात माजी खासदार डॉ़ उल्हास पाटील यांची भेट घेण्यासाठी कार क्र मांक- एमएच़१९़बी़यू़ ३३७२ ने आले होते़ डॉ़ पाटील यांची भेट घेतल्यानंतर रात्री ८़४० वाजेच्या सुमारास वराडे हे आपल्या कारमध्ये बसून घराच्या दिशेने निघाले़ मात्र, काही अंतरावर डॉ़ मालती हॉस्पीटलसमोर दोन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी त्यांच्या वाहनाला अडविले़ त्यानंतर हॉकी स्टीकने कारची काच फोडत वराडे यांना बाहेर काढले़ त्यानंतर त्यांच्या खिशातील पाच हजार रूपये हिसकावून घेतले़
एकाने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली़ हल्लेखोरांनी गळ्यातील सोन्याची चेन देखील ओढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांच्या तावडीतून स्वत:ला कसे-बसे सोडवून घेत वराडे यांनी जिल्होपठ पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली़

Web Title: Sanjay Vardan's former Taluka chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.