जळगावातील महिलेची गुजरातमध्ये ४५ हजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:52 AM2019-01-06T11:52:21+5:302019-01-06T11:53:08+5:30

धक्कादायक : सुप्रीम कॉलनीतील दोन महिलांचा सहभाग, लग्नाच्या स्वयंपाकासाठी नेले होते

 Sales of 45 kg of women in Jalgaon in Gujarat | जळगावातील महिलेची गुजरातमध्ये ४५ हजारात विक्री

जळगावातील महिलेची गुजरातमध्ये ४५ हजारात विक्री

Next
ठळक मुद्देम्हैसाणा येथे महिलेचे वास्तव्य


जळगाव : अहमदाबाद शहरात लग्नाचा स्वयंपाक करण्यासाठी नेलेल्या शहरातील ३५ वर्षाच्या महिलेला जळगाव व गुजरात येथील महिलांच्या मदतीने ४५ हजार रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचा पती व मुलीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणारी अलकाबाई व कमलबाई या दोन महिलांनी ज्योती (नाव बदल केले आहे) हिला अहमदाबाद येथे लग्नसमारंभात जेवण बनविण्याचे काम घेतले आहे, तेथे कामाला चल असे सांगून आॅक्टोबर महिन्यात कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशीच अहमदाबाद येथे नेले.
बरेच दिवस झाल्यानंतर ज्योती घरी आली नाही म्हणून पती व मुलीने अलकाबार्ई व कमलबाई यांच्याकडे चौकशी केली असता, तुझ्या आईला ४५ हजार रुपयात विक्री केली आहे. परंतु तीन दिवसात ती परत येईल असे या दोघींनी सांगितले.
दीड महिना झाला तरी ज्योती परत आली नाही म्हणून पतीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. त्यावरुन २ डिसेंबर २०१८ रोजी हरविल्याची नोंद घेण्यात आली.
दरम्यान, अहमदाबाद येथे असताना ज्योती हिने सलग आठ दिवस कुटुंबांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क ठेवला होता. त्यानंतर संपर्क बंद झाला. त्यामुळे जळगावातील कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
म्हैसाणा येथे महिलेचे वास्तव्य
म्हैसाणा येथे पिंटू नावाच्या व्यक्तीला ज्योती हिला विकण्यात आले. कमल व अलका यांना तेथे लिलाबेन या महिलेने मदत केली. तेथे तिचे नाव सुनिता ठेवण्यात आले असल्याची माहिती ज्योती हिच्या मुलीने अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आईला कोणी विक्री केले, कोणाला विक्री केले याची सर्व माहिती देऊनही पोलिसांकडून दखल घेतली नसल्याचे यात म्हटले आहे.
विरोधानंतरही नेले ज्योतीला
अलकाबार्ई व कमलबाई या दोन्ही अहमदाबाद येथे कामाला नेत असल्याचे ज्योती हिने पती व मुलीला सांगितले असता त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ज्योती हिला दोन्ही जण बाहेर घेऊन गेल्या. तेथून दुपारी चार वाजता आई परत आली असता तिने कपडे बदल केले होते व अवस्थाही वाईट होती. त्याबाबत विचारणा केली असता आई घाबरलेली होती व माहिती देण्यास नकार दिला. त्याच दिवशी रात्री ती अहमदाबाद येथे गेली असे मुलीचे म्हणणे आहे.
हरविल्याची नोंद झाल्यानंतर तपासासाठी अहमदाबाद व म्हैसाणा येथे जावून आलो. मात्र ज्योतीची भेट झाली नाही. ज्या व्यक्तीकडे आहे,त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला होता. तेव्हा ज्योती ही बोलली. मी लग्न केलेले आहे, त्यामुळे जळगावला येवू शकत नाही असे तिने सांगितले. तपास पूर्ण झालेला नसल्याने आणखी एकदा गुजरातमध्ये जाणार आहे. -राजाराम पाटील, तपासाधिकारी
माझ्या आईची विक्री करणाऱ्या अलकाबाई, कमलबाई व लिलाबेन यांचा महिलांना विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करुन आईची सुटका करावी.
-सारिका, ज्योतीची मुलगी

Web Title:  Sales of 45 kg of women in Jalgaon in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.