जळगाव मनपाच्या थकबाकीदारांमध्ये मातब्बर मंडळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:20 AM2019-02-03T11:20:25+5:302019-02-03T11:22:29+5:30

जगवानी, खटोड, आमदारांच्या बंधूचा समावेश

Residents of the Jalgaon Municipal Corporation | जळगाव मनपाच्या थकबाकीदारांमध्ये मातब्बर मंडळी

जळगाव मनपाच्या थकबाकीदारांमध्ये मातब्बर मंडळी

Next
ठळक मुद्देखटोड कुटूंबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी

्र्रजळगाव : मनपा प्रशासनाने चौकाचौकात लावलेल्या बड्या थकबाकीदारांच्या याद्यांमध्ये शहरातील मातब्बर व्यक्तींचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी, माजी नगराध्यक्ष पांडूरंग काळे, आमदार चंदूलाल पटेल यांचे बंधू देवराम पटेल, बांधकाम व्यवसायीक श्रीराम खटोड यांचा समावेश असून, या सर्व थकबाकीदारांना मनपा प्रशासनाने जप्तीची नोटीस बजावली आहे.
मनपा प्रशासनाकडे वसुलीसाठी आता केवळ दोन महिन्यांचा काळ शिल्लक असून, मनपाने आता वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने चारही प्रभागांमध्ये प्रत्येकी १०० अशा एकूण ४०० बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी चौकाचौकात प्रसिध्द केली आहे. तसेच या सर्व थकबाकीदारांच्या घरी जप्तीची नोटीस पाठवून थकीत रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्यांचा मालमत्तांवर बोजा देखील बसविण्यात येणार आहे.
मनपाकडून कारवाईची अपेक्षा
मनपाकडून बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी लावण्यात आली असली तरी या मनपाने जप्तीची नोटीस बजावल्याव्यतिरीक्त कारवाईबाबत कोणतेही नियोजन नाही. दरवर्षी मनपाकडून या थकबाकीदारांना जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठवल्या जातात. मात्र, मनपाची वसुली समाधानकारक झाली की या थकबाकीदारांवर कुठलीही कारवाई ही केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाईसाठी हिंमत दाखवणारे मनपा प्रशासन या बड्या व्यक्तींवर कारवाई करण्यास धजावेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. याबाबत मनपा उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना विचारले असता, मनपाची थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. थकबाकीदार थकबाकी भरतात की मनपा कारवाई करते याकडे आता लक्ष लागून आहे.
माजी आमदार व आमदारांचे बंधूही थकबाकीदार
बड्या थकबाकीदारांमध्ये माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी व आमदार चंदुलाल पटेल यांचे बंधू देवराम पटेल यांचा देखील समावेश आहे. गुरुमुख जगवानी यांच्याकडे १ लाख २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ९० हजार रुपयांची थकबाकी ही गेल्यावर्षीची आहे. देवराम पटेल यांच्याकडे देखील ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यासह माजी नगराध्यक्ष पांडूरंग काळे यांच्याकडे ५९ हजार रुपयांची थकबाकी आहे.
खटोड कुटूंबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी
४शहरातील मोठे बांधकाम व्यवसायिक असलेले श्रीराम खटोड यांच्या कुटंूबियांकडे अडीच लाख रुपयांची थकबाकी आहे. श्रीराम खटोड यांच्याकडे १ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ५६ हजार रुपयांची वसुली ही चालु वर्षातील तर उर्वरित थकबाकी ही गेल्यावर्षाची आहे. तसेच सुधा श्रीकांत खटोड यांच्याकडे १ लाख ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ९९ हजार रुपयांची थकबाकी ही या वर्षाची तर ७९ हजार रुपयांची थकबाकी ही गेल्यावर्षींची असल्याचे मनपातर्फे लावण्यात फलकावर नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Residents of the Jalgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.