यावल येथे पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:54 PM2018-01-30T13:54:38+5:302018-01-30T13:56:04+5:30

मोदी शासनावर  जोरदार टिका

Rally against the hike in petrol prices | यावल येथे पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

यावल येथे पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

Next
ठळक मुद्दे18 हजाराचा फटका पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 30 - पेट्रोल दरवाढीसह जीवणावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात यावल  ताुलका काँग्रेसच्यावतीने शहरातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार शिरीष चौधरी,  रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , मधुकर सहकारी साखर कारखाव्याचे   चेअरमन शरद महाजन, पं. स. उपसभापती उमाकांत पाटील, यांनी केले.
 धनश्री चित्रमंदिरापासून बोरावलगेट मुख्य रस्ता, गवत बाजार साथ, जुना भाजीबाजार , बुरूज चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी शहरातील जागोजागीमाजी आमदार शिरीष चौधरी, ताुलकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी मोदी शासनावर  जोरदार टिका करत दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याचे सांगितले. कार्यकत्यार्ंन्ी शासनाचा निषेध केला आहे. मसाका  नरेंद्र नारखेडे, माजी उपसभापती लीलाधर चौधरी, पं. स. , कलीमा तडवी, नावरे सरपंच समाधान पाटील, शहर अध्यक्ष  कदिरखान, अमोल भिरूड, जलील पटेल, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
18 हजाराचा फटका
 बैलगाडी मोर्चा येथील बुरूजचौकात पोहताच गर्दिचा फायदा घेत मोर्चात सहभागी नावरे येथील उपसरंपच समाधान पाटील यांच्या पँटच्या मागील खिशातून अज्ञात चोरटयांने 18 हजार रुपये लंपास केले.

Web Title: Rally against the hike in petrol prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.