भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:05 AM2018-06-26T01:05:06+5:302018-06-26T01:06:22+5:30

घरांसोबतच शेतीचेही नुकसान

 Rain fall in Bholane village in many houses | भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात

भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात

googlenewsNext
ठळक मुद्देजामनेर शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी चांगलाच जोर धरला आहे.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने हतनूर धरणात पाण्याची सातत्याने आवक वाढत असल्याने धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.तापी नदीच्या उगम स्थानासह इतर ठिकाणी दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी नऊ वाजता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले, त्याव्दारे १३७ क्युसेक्स पाणी प्रती सेकंद तापी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

पारोळा, जि.जळगाव : पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, नराणे नदी व दोन्ही बाजूंना असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे हेच पाणी नदी-नाल्याकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. यात अनेक जणांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुराच्या या पाण्यामुळे शेतांमधील बांध फुटले असून, शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
भोलाणे गावात नदी व नाल्याकाठी रहात असलेल्या हिरालाल बहादूर पाटील, चतुर पाटील, विष्णू व्यंकट पाटील, सुधाकर भगवान पाटील, प्रकाश अर्जुन करंजे या ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. घरात साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच पुराचे पाणी अनेक शेतांत शिरल्याने अनेक शेतातील बांध फुटले आहेत. पावसाच्या पाण्यासोबत शेतातील माती, पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
इंदासी धरण भरले
या भोलाने गावानजीक असलेले इंदासी धरण ८० टक्के भरले. या धरणातून भोलाणे, पिंपळकोठा, वसंतनगर, जीराळी इंधवे, महालपूर या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आहेत. हे धरण कोरडेठाक झाले होते. या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण धरण भरल्याने या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.







 

Web Title:  Rain fall in Bholane village in many houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.